Numerology Habits And Personality: एखाद्या व्यक्तीचा मूलांक ओळखायचा असेल तर आपण फक्त जन्मतारीख, जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टींची मदत लागते. मूलांकाला जेव्हा भाग्यांकाची साथ लाभते तेव्हा जीवनातील खूप खोलवर गोष्टीचा उलगडा होत जातो. आजच्या लेखात आपण ९ मूलांक असणाऱ्यांचे आयुष्य कसे असते, त्यांचा स्वभाव, त्यांच्या सवयी याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांचा मूलांक यातील एक असल्यास त्यांचा स्वभाव व भविष्य या दोन्हीचे अंदाज आवर्जून जाणून घ्या..
जर तुमचा मूलांक ९ असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान मानले जाता. कारण – ९ मूलांक असणाऱ्या मंडळींचा स्वामी मंगळ असतो आणि तो तुम्हाला प्रचंड ऊर्जा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि मोठे यश मिळवण्याची क्षमता देतो. ९ मूलांक असणारी मंडळी कठोर परिश्रम, धैर्य आणि दूरदृष्टीच्या बळावर आयुष्यात प्रचंड संपत्ती कमवू शकतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मंगळाच्या प्रभावामुळे ही मंडळी खूप उत्साही आणि दृढनिश्चयी असतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.
९ मूलांक असलेल्या लोकांची तीक्ष्ण विचारसरणी आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता त्यांना कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ बनण्याची संधी देते. आर्थिक बाबतीत नेहमीच ते एक पाऊल पुढे असतात आणि त्यांना कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांचा स्वभवात आत्मविश्वास आणि निर्भय असते . मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यात धैर्य, नेतृत्व क्षमता प्रबळ असते. पण, राग आल्यावर मात्र त्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते.
योग्य दिशेने वाटचाल केली पदरात पडते यश (Numerology For Financial Success)
व्यवसाय, व्यवस्थापन आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो. मंगळवारी नवीन काम सुरू केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते असे मानले जाते. जर तुमचा मूलांक ९ असेल आणि तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर तुमच्या आयुष्यात केवळ यशच नाही तर संपत्ती आणि प्रतिष्ठा देखील कायमची तुमच्या आयुष्यात राहू शकते.