9 September 2025: अंकशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षाच्या मूलांकानुसार त्या वर्षावर कोणत्या तरी एका ग्रहाचे वर्चस्व असते. त्याचप्रमाणे २०२५ या वर्षावर मंगळाचे वर्चस्व आहे. अंकशास्त्रानुसार, २०२५ या वर्षाचा मूलांक ९ असल्याने हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे आहे. मंगळ हा साहस, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानला जातो. दरम्यान, आज ९ सप्टेंबर २०२५ (मंगळवार) म्हणजे ९-९-९ चा अद्भूत संयोग जुळवून आणणारा वर्षातील प्रभावी दिवस त्यात आज मंगळवारही आहे. म्हणजे संपूर्ण दिवस हा मंगळाच्या वर्चस्वाखाली राहील. आजच्या दिवसाला अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राही खूप प्रभावी मानला जात आहे. आजचा हा दिवस अनेकांच्या आयुष्याची गुरूकिल्ली बनण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसेच आजचा दिवस १२ राशींपैकी काही राशींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल.

आजचा दिवस या दोन राशींसाठी लाभदायी (9-9-9 triple 9)

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२५ संपूर्ण वर्षच खूप उत्तम फळ देणारे आहे. कारण मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे. आजचा संपूर्ण दिवसही या राशीसाठी खूप लाभदायी असेल. या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि साहस निर्माण करेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या वर्षात तुमचे प्रमोशनही होईल. परंतु विणाकारण कोणावर रागवू नका नाहीतर तुमचेच नुकसान होऊ शकते.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना देखील हा दिवस अत्यंत सकारात्मक जाईल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील. आजच्या दिवशी अहंकार बाळगू नका.

आजचा दिवस काय करायला हवं?

आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक लाभदायी ठरावा यासाठी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्या आणि हनुमान चालिसेचे पठण करा.

आजच्या दिवशी गरीबांना यथाशक्ति दान करा.

कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)