Numerology Compatibility By Date Of Birth : अंकशास्रामध्ये मूलांकला विशेष महत्त्व आहे. मूलांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेवरून ठरवला जातो. एखाद्या व्यक्तीचा जन्म १, १०, १९ आणि २८ तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक १ असतो. म्हणजेच २+८ = १०, १+० = १. जाणून घेऊ या कोणत्या मूलांकचे लोक कोणत्या मूलांकसाठी सर्वात बेस्ट पार्टनर ठरू शकतात.
१, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. मूलांक १ असलेल्या लोकांसाठी परफेक्ट पार्टनर मूलांक २, ३, ४ आणि ९ असणारे लोक असू शकतात.
ज्या लोकांचा जन्म २, ११, २० आणि २९ तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक २ असतो. या मूलांकच्या लोकांसाठी १, ७ आणि ३ मूलांकचे लोक परफेक्ट जोडीदार ठरू शकतात.
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकच्या लोकांसाठी १, २, ५ आणि ७ मूलांक असलेले लोक उत्तम पार्टनर ठरू शकतात.
महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. मूलांक ४ असलेल्या लोकांचा परफेक्ट पार्टनर १, २ आणि ९ तारखेला जन्मलेले लोक असतात.
कोणत्याही महिन्याच्या ५, १४, आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. मूलांक ५ असलेल्या लोकांची जोडी मूलांक १, २, ६, ७ आणि ८ तारखेला जन्मलेल्या लोकांबरोबर ठरू शकते.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला झाला असेल, त्याचा मूलांक ६ असतो. मूलांक ६ असलेले लोक मूलांक ३, ४,५ आणि ६ असणाऱ्या लोकांसाठी परफेक्ट पार्टनर ठरू शकतात.
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ७ असतो. मूलांक ७ असलेल्या लोकांसाठी २, ३,५ आणि ८ मूलांक असलेल्या लोकांची जोडी परफेक्ट मानली जाते.
महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. मूलांक ८ च्या लोकांची मूलांक २, ४, ७ आणि ९ असलेल्या लोकांबरोबर चांगली पटते.
महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ असलेल्या लोकांसाठी २, ३, ६ आणि ८ मूलांक असणारे लोक चांगले जोडीदार ठरू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)