Numerology : अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंतच्या अंकांचे वर्णन केले जाते. कारण- हे अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंधित आहेत. त्यात आज आपण ६ या अंकाबद्दल बोलणार आहोत, जो धन व वैभवदाता शुक्राशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की , ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे, ज्यांचा मूल्यांक ६ असतो. या मूलांकात जन्मलेल्या लोकांना आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही. कारण- भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांचा मूलांकही ६ आहे. ६ मूल्यांक असलेले लोक खूप श्रीमंत असतात, त्यांना अभिमानाने जगणे आवडते. या मूलांकाशी संबंधित इतर माहिती जाणून घेऊया…
हुशार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व
मूल्यांक ६ शी संबंधित लोक वैभवशाली जीवन जगतात. तसेच, हे लोक वर्तमानात जगतात आणि त्यांना कंजूषपणा अजिबात आवडत नाही. त्याच वेळी हे लोक नेहमीच स्वतःला तरुण समजतात, त्यांना चांगले राहणीमान आवडते. जेव्हा हे लोक एखाद्याला भेटतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. हे लोक थोडे मजेशीर असतात. तसेच, हे लोक कोणत्याही कार्यक्रमात जातात तेव्हा एक वेगळा वातावरण तयार करतात.
पैसे कमवण्यात हुशार असतात
अंकशास्त्रानुसार, ६ मूल्यांक असलेले लोक पैसे कमवण्यात हुशार असतात. तसेच, त्यांचा ड्रेसिंग सेन्स उत्तम असतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात कोणताही दोष नसतो. म्हणून असे लोक आयुष्यभर श्रीमंत राहतात. तसेच, हे लोक वेळोवेळी देश-विदेशांत प्रवास करतात. त्यांना जीवनात सर्व आनंद मिळतो.
मान आणि सन्मान
ज्यांचा मूल्यांक ६ आहे, त्या लोकांना समाजात खूप आदर मिळतो. तसेच हे लोक अन्याय सहन करू शकत नाहीत. या लोकांचे विचार अगदी ठाम आणि स्पष्ट असतात. तसेच, हे लोक व्यवसायात जोखीम घेऊन पैसे कमवतात. त्यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण असतात.