Mulank 4: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रह हा कठोर भाषण, जुगार, प्रवास, चोरी, वाईट कृत्ये, त्वचारोग, धार्मिक तीर्थयात्रा आणि इतर गोष्टींसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. राहू ग्रह ४ या अंकावर देखील राज्य करतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ असतो. या मूलांकाचे लोक सर्जनशील आणि दूरदर्शी स्वभावाचे असतात. ते राजकारणातही यशस्वी असतात. ते शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्येही बक्कळ नफा कमावतात. त्यांना राहू ग्रहाचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात. या मूलांकाच्या लोकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ…
व्यावहारिक आणि सर्जनशील
अंकशास्त्रानुसार, ४ मूलांकाचे लोक खूप व्यावहारिक असतात. ते कमी भावनिक आणि सर्जनशील असतात. ते शास्त्रज्ञ किंवा चांगले राजकारणी देखील असू शकतात. विशेष म्हणजे या लोकांना प्रत्येक विषयाचे चांगले ज्ञान असते. ते स्वत:च्या मनाप्रमाणे जगणारे असतात. असं असताना ते प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात. ४ मूलांकाचे लोक खूप नियोजन करून सर्व कामं करतात. म्हणूनच राहू अनेकदा त्यांना भरपूर पैसा मिळवून देतो.
क्रिएटिव्ह स्वभावाचे
या अंकाचे लोक प्रत्येक गोष्टीचा स्वत:च्या समजुतीनुसार विचार करतात. ते इतरांचे म्हणणे समजून घेत नाहीत किंवा ऐकत नाहीत. जरी लोकांनी त्यांना कोणताही सल्ला दिला तरी त्यांना ते ऐकायला आवडत नाही. तसंच या लोकांना थोडे एकटे राहणे आवडते. मात्र, जेव्हा ते एखाद्या मेळाव्यात किंवा पार्टीत बसतात, तेव्हा ते उधळपट्टी देखील करतात. त्यांचा स्वभाव चिडखोर असतो. ७ हा अंक केतूशी संबंधित आहे. म्हणूनच ४ अंकाचे लोक ७ अंकाच्या लोकांशी चांगले जुळतात. तर ४ अंकाचे लोक २ आणि ८ अंकाच्या लोकांशी चांगले जुळवून घेत नाहीत.
