Sudden Wealth Numerology Prediction : अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येची स्वतःची ऊर्जा आणि वैशिष्ट्ये असतात. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, करिअर व भविष्य या बाबी त्याच्या जन्मतारखेवरून अचूकपणे सांगता येतात. त्यासाठी मूलांकाचा वापर केला जातो. मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंत असते आणि प्रत्येक संख्या कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. तर आज आपण अनोख्या बाजूने विचार करणाऱ्या, अचानक श्रीमंत होणाऱ्या मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत…
जर एखाद्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ वा ३१ तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक ४ असतो. या संख्येचा स्वामी ग्रह हर्षल आहे. ज्या लोकांची ४, १३, २२ व ३१ यापैकी एखादी जन्मतारीख आहे, त्या लोकांच्या व्यक्तिमत्त्व, विचार व जीवनातील निर्णय यांवर या ग्रहाचा खोलवर प्रभाव पडतो.
मेहनतीच्या जोरावर मिळवतात यश (Numerology For Success)
४ मूलांक असणारे लोक अत्यंत मेहनती असतात. स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि एकदा काम सुरू केले की, ते पूर्ण करूनच राहतात. त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण यांमुळे अचानक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्याची शक्यता जास्त असते. पण, कधी कधी हे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी चुकीचा मार्गदेखील निवडू शकतात.
‘या’ क्षेत्रात चांगली कामगिरी करतात (Number 4 Lucky Professions )
अंकशास्त्रानुसार, ४ मूलांक असणारे लोक निकालांची चिंता न करता, धाडसी निर्णय घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची तीक्ष्ण विचारसरणी आणि अनोखी कल्पना त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. त्याचप्रमाणे ही मंडळी मीडिया, राजकारण, कायदा व व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. त्यांची धोरणात्मक विचारसरणी आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते. त्याचप्रमाणे हे लोक धार्मिक आणि शिस्तप्रिय असतात. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे समाजात त्यांना आदर मिळतो आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.