Birth Date Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संख्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या मार्गाला आकार देत नाही तर व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या जीवनात आणि येणाऱ्या अनेक समस्यांपासून संरक्षण आणि कधी कधी चेतावणी सुद्धा देतात. तर जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला अगदी सहज समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ, जर तुमची जन्मतारीख २२ असेल तर तुमचा मूलांक २+२=४ म्हणजे तुमचा मूलांक ४ आहे.
तर आज आपण अशा मूलांकाच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांना सांगणेच पसंत करतात आणि ते गोष्टी लपवून ठेवण्यात सुद्धा माहिर असतात. तर हा मूलांक आहे ६. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ६ असतो. असे लोक सहसा कमी बोलतात. पण, त्यांचा गोड आणि मोहक आवाज लोकांची मने जिंकून जातो. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांनी इतरांना प्रभावित करतात.
मूलांक ६ असलेल्या लोकांना आरामदायी जीवन जगायला आवडते. त्यांना प्रत्येक काम शांतता आणि संयमाने करायला आवडते. त्याचबरोबर सुख-सोयींनी भरलेल्या वातावरणात त्यांना राहायला आवडते. त्यांच्याकडे इतरांचे गुपित सुरक्षित ठेवण्याची विशेष क्षमता असते. कारण – कोणी यांच्याबरोबर वैयक्तिक गोष्ट शेअर केली की, ही व्यक्ती पूर्ण निष्ठेने त्यांनी गोष्ट स्वतःकडे सुरक्षित ठेवते.
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेल्या लोकांचे व्यक्तिमत्व नैसर्गिकरित्या आकर्षक असते. त्यांच्या सौंदर्याने आणि स्टायलिश शैलीने लोकांना ते प्रभावित करतात. त्यांना चांगले कपडे घालायला आवडते. ही मंडळी मर्यादित लोकांमध्येच मिसळतात, सगळ्यांशी मैत्री करत नाहीत. यामुळे कधीकधी त्यांचा स्वभाव इतरांना अहंकारी वाटू शकतो. तर तुमचा मूलांक ६ आहे का? हो.. तर तुमच्यात सुद्धा असेच काहीसे गुण आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा…