Emotional Mulank : ज्योतिषशास्त्रामध्ये जसे राशींना विशेष महत्त्व आहे तसे अंकशास्त्रामध्ये मूलांकला विशेष महत्त्व आहे. या मूलांकच्या आधारावर व्यक्तीचे भविष्य, व्यक्तिमत्व, वागणूक इत्यादी विषयी माहिती जाणून घेता येते. प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा वेगवेगळा असतो. आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल की मूलांक म्हणजे काय? तर मूलांक हा जन्मतारखेची बेरीज असते. जर तुमची जन्म तारीख २२ असेल तर २+२= ४, तर हा तुमचा मूलांक असतो.
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकची खासियत सांगितली आहे. तसेच प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह वेगळा असतो. मूलांकच्या स्वामी ग्रहावरून त्या संबंधित व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतात. आज आपण मूलांक २ विषयी जाणून घेणार आहोत.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक २ असतो. मूलांक २ चे स्वामी चंद्र असतात आणि चंद्राचा प्रभाव त्यावर दिसून येतो. हे लोक अत्यंत मार्मिक आणि भावुक स्वभावाचे असतात. हे शांत, संवेदनशील आणि प्रेमळ असतात. त्यांच्यामध्ये चांगली संवाद कौशस्य असतात.
इमोशनल आणि ओव्हरथिंकर
मूलांक २ असलेले लोक खूप भावूक आणि संवेदनशील असतात. चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे हे लोक मनाप्रमाणे जगतात. हे लोक क्रिएटिव्ह आणि कलात्मक स्वभावाचे असतात. चंद्राच्या प्रभावाने हे लोक खूप जास्त भावुक असतात आणि कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करतात. काही वेळा ते खूप भावनिक होऊन इतरांच्या बोलण्यात लवकर फसू शकतात.
नेहमी टेन्शनमध्ये असतात
जर मूलांक २ असलेल्या लोकाचा चंद्र कमकुवत असेल तर ते लहान लहान गोष्टींचे टेन्शन घेते. त्यांचे मन स्थिर राहत नाही. ते कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. किरकोळ गोष्टीवरून ते भावुक होते आणि रडते.
प्रेमात होते फसवणूक
मूलांक २ असलेल्या लोकांची सहसा प्रेमात फसवणूक होते. वारंवार ते दु:खी होतात. त्यांच्या लव्हलाइफमध्ये किती चढ उतार असले तरी त्यांची मॅरीड लाइफ नेहमी चांगली राहते. ते लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाही.