कोणत्याही ग्रहाच्या परिवर्तनाचे परिणाम सर्वच राशींना भोगावे लागतात. फरक फक्त इतकाच असतो की काहींसाठी हे परिणाम शुभ असतात तर काहींसाठी अशुभ. अशा परिस्थितीत प्रत्येक राशींच्या लोकांना, विशिष्ट ग्रहाच्या परिवर्तनाचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. १६ ऑक्टोबरला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करून मिथुनमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे ‘महा दरिद्र योग’ तयार होत आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरीही चार राशींसाठी हा योग संकटे घेऊन येऊ शकतो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • वृषभ

या राशीच्या लोकांसाठी ‘महा दरिद्र योग’ त्रासदायक ठरू शकतो. याचे कारण म्हणजे या काळात वृषभ राशीच्या संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल. तसेच वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र दुर्बल होऊन त्याचा अस्त होईल. यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, यावेळी व्यवसाय संथ गतीने सुरु राहील. या काळात नवीन गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न करावा, त्याचबरोबर कोणालाही कर्ज देताना सर्व गोष्टींचा नीट विचार करून निर्णय घ्यावा.

Nakshatra transformation of Ketu These three zodiac signs will bring happiness
८ सप्टेंबरपर्यंत पैसाच पैसा! केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् मानसन्मान
Mohadi taluka, bridge, washed away,
बापरे… चक्क पूल वाहून गेला! १८ लाखांचा खर्च अन् १८ आठवड्यांच्या आतच…
Budh Vakri 2024
५ ऑगस्टपासून ‘या’ राशीधारकांना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी? बुधदेवाच्या वक्री चालीने मिळू शकतो गडगंज पैसा
Venus Uday 2024
वर्षाच्या शेवटपर्यंत शुक्रदेवाच्या कृपेने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? बँक बँलेन्समध्ये होऊ शकते झपाट्याने वाढ
Shani will create Shash Raja Yoga three signs will earn a lot of money
१५ नोव्हेंबरपर्यंत पैसाच पैसा! शनि निर्माण करणार ‘शश राजयोग’, ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार भरपूर पैसा
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
Shani Vakri 2024
दिवाळीनंतर शनिदेव बदलणार चाल! नोव्हेंबरपर्यंत हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब? मिळू शकतो अपार पैसा
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
  • सिंह

‘महा दरिद्र योग’ तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याचबरोबर, या राशीचा स्वामी सूर्य देव १७ ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे या काळात या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल. त्याचवेळी, संपत्तीचे कारक मृत्यूच्या ठिकाणी स्थित असल्याने हा योग तयार होईल. म्हणूनच या राशीच्या लोकांनी या काळात खूप सावध राहण्याची गरज आहे. या दिवसांमध्ये जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

  • वृश्चिक

महा दरिद्र योग या राशींच्या लोकांसाठीही अशुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात या राशीचा स्वामी असलेला मंगळ ग्रह शत्रू राशीच्या मृत्यूच्या ठिकाणी स्थित असल्याने हा अशुभ योग तयार होत आहे. त्याचबरोबर केतू ग्रहाची नववी राशी देखील अस्त होत असून संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणताही शुभ ग्रह नसेल. त्यामुळे यावेळी काळजी घ्यावी. कोणतेही नवीन काम सुरू न करणे उत्तम ठरेल. तसेच या काळात व्यवहारात सावधगिरी बाळगावी.

  • कुंभ

महा दरिद्र योगामुळे या राशींच्या लोकांचेही नुकसान होऊ शकते. कारण या राशीचा स्वामी शनिदेव १२व्या घरात विराजमान आहे. तसेच संक्रमण कुंडलीच्या केंद्रस्थानी कोणतेही ग्रह नाहीत. भाग्य स्थानाचा स्वामी शुक्रदेव दुर्बल अवस्थेत आहे. त्याचबरोबर पितृदोष निर्माण होत असल्यामुळे या काळात या राशीच्या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. यावेळी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)