Palmistry 6 Lucky signs on hand that shows wealth and peace how to read hands jyotish vidya | Loksatta

Palmistry: हातावर ‘ही’ ६ चिन्हे असलेल्या व्यक्ती असतात नशीबवान; संपत्ती व समृद्धीची कधी नसते कमी

Lucky Signs On Palm: ज्योतिष व हस्तरेखा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातावर असे काही निशाण असतात जे त्यांच्या मेहनतीची दिशा ठरवतात.

Palmistry: हातावर ‘ही’ ६ चिन्हे असलेल्या व्यक्ती असतात नशीबवान; संपत्ती व समृद्धीची कधी नसते कमी
Lucky Signs On Palm (फोटो: जनसत्ता)

Lucky Signs On Palm: असं म्हणतात की व्यक्तीचं नशीब हे त्याच्या हातात असतं, याचा मूळ अर्थ मेहनतीने तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता असाही होतो. तरीही हातावरील निशाण, हस्तरेषा व ज्योतिष याविषयी अनेकांना कुतुहूल असतं. ज्योतिष व हस्तरेखा शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या हातावर असे काही निशाण असतात जे त्यांच्या मेहनतीची दिशा ठरवतात. अनेकदा खूप मेहनत करूनही हवं तसं फळ मिळत नाही यामागे या हस्तरेखा कारण असू शकतात असे ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार हातावरील अशी कोणती चिन्हे आहेत ज्यामुळे तुमच्या यशाची रेखा स्पष्ट होते व धन, संपत्ती व समृद्धी प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो हे जाणून घेऊया..

हत्तीचे निशाण

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर हत्तीचे चिन्ह असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अशा व्यक्तींवर सरस्वती व लक्ष्मी या दोघांचा वरदहस्त असतो. हत्ती हे गणरायाचे प्रतिक आहे त्यामुळे अशा व्यक्ती बुध्दीवान, कलाकार असतात.चार चौघात त्यांना स्वतःची ओळख बनवता येते.

माश्याचे निशाण

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर माश्याचे निशाणही शुभ असते. या व्यक्तींना परदेश वारीचे योग असतात. बहुतांश वेळा परदेशी गुंतवणुकीतून यांना अधिक फायदा होऊ शकतो. भौतिक सुख व आलिशान आयुष्य त्यांचे ध्येय असते.

Samudrik Shastra: चेहरा कसा वाचाल? भुवयांमध्ये अंतर असणाऱ्यांना आवडतं गॉसिप तर चंद्रकोर भुवई म्हणजे लग्नानंतर..

पालखीचे चिन्ह

हातावर पालखीचे निशाण असणाऱ्या व्यक्तींना लक्ष्मीचे वरदान असते असं म्हणतात. जितका अधिक खर्च तितकी अधिक मिळकत असं यांचं आयुष्य असतं मात्र अत्यंत विचारपूर्वक गुंतवणूकीत ते खर्च करतात. समाजात मान व प्रतिष्ठा मिळवणे या व्यक्तींचे ध्येय असते.

स्वास्तिक चिन्ह

हस्तरेखा शास्त्र सांगते की, हातावर स्वास्तिक चिन्ह असणाऱ्या व्यक्ती धनवान असतात व यांच्यावर माता सरस्वतीची ही खूप कृपा असते. शिक्षण व राजकारणात नाव कमावण्याचे योग या व्यक्तींच्या नशिबात असतात. भौतिक सुखाइतकेच त्यांना मानाचे जीवन जगणेही आवडते.

कलश चिन्ह

हस्तरेखा शास्त्रानुसार हातावर कलश चिन्ह असल्यास या व्यक्ती धर्म क्षेत्रात नाव कमावू शकतात. श्रद्धाळू स्वभाव असल्याने त्यांचा देवावर अतूट विश्वास असतो.

सूर्याचे चिन्ह

हस्तरेखा शास्त्र सांगते की, ज्या व्यक्तींच्या हातावर सूर्याचे निशाण असते अशा व्यक्तींचे भविष्य व वर्तमान सूर्याप्रमाणेच तेजस्वी असते. नेतृत्व करण्याचा स्वभाव यांचा मूळ गुणधर्म असतो. अधिकारी पदावर काम करण्याचे यांचे ध्येय असते.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ऑक्टोबर महिना ‘या’ चार राशींसाठी ठरू शकतो त्रासदायक; करावा लागेल आर्थिक संकटाचा सामना

संबंधित बातम्या

२०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट
माता लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींचे भाग्य अचानक चमकणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी
२८ डिसेंबर पासून ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? बुधाचा प्रवेश मिळवून देणार अपार श्रीमंती
१ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…