Purva Phalguni Nakshatra : हिंदू पंचांगानुसार वर्षभरात २७ नक्षत्र येतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तारामंडळातील ११वं नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र म्हणून ओळखलं जातं आणि हे नक्षत्र मघासारखंच हिंदी महिन्यात येतं, ज्याला आपण फाल्गुन म्हणतो. पूर्वा फाल्गुनी म्हणजे चारपायी दिवाण किंवा सिंहासनाचे पुढील दोन पाय असतात, असं म्हणतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला दहावे नक्षत्र मघा असते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मघाचा अर्थ सिंहासन आणि त्यानंतर येणारे पूर्वा फाल्गुनी चारपायी असल्यामुळे या नक्षत्राला विश्रामाचे नक्षत्रसुद्धा म्हणतात.

हेही वाचा : शेवटच्या श्वासापर्यंत शत्रुत्व ठेवतात ‘या’ राशीचे लोक! तुम्ही तर नाही ना त्यांच्यापैकी एक?

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा

पूर्वा फाल्गुनी नक्षत्र

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात. या व्यक्तींना समाजात खूप आदर आणि सन्मान मिळतो, असं मानलं जातं. असं म्हणतात की या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास असतो आणि नेतृत्व करण्याची क्षमता लहानपणापासूनच असते. त्यामुळे मोठमोठ्या जबाबदाऱ्या हे लोक सहज पेलतात.

या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती जुने वाद लवकर संपवतात, त्यामुळे मध्यस्थी करण्यात ते इतरांसाठी खूप फायदेशीर असतात, असं मानलं जातं. असं म्हणतात की या लोकांनी ऑफिसमध्ये सार्वजनिक जबाबदारी असणारे काम घेण्यापेक्षा एकावरच जबाबदारी असलेलं काम घ्यावं, कारण या लोकांमध्ये एकट्याने मोठी जबाबदारी पेलण्याची क्षमता असते.

हेही वाचा : या राशींचे लोक असतात बेस्ट बाबा ? मुलांसाठी असतात आदर्श

असं म्हणतात की हे नक्षत्र असणारी महिला गृहिणी असेल तर त्यांना स्वयंपाकात खूप जास्त हस्तक्षेप आवडत नाही. त्या एकट्या खूप चांगलं काम करतात. या लोकांना नव्या गोष्टी शिकायला फार आवडत नाहीत. यांच्यासाठी सुख खूप जास्त महत्त्वाचं असतं, असं मानलं जातं.
असंही म्हटलं जातं की या लोकांचे एक वेगळं जग असतं, ज्यामध्ये ते खूप आनंदी असतात. या लोकांच्या प्राथमिकता लिस्टमध्ये पैसा कधीच सुरुवातीला नसतो तर यांच्यासाठी सुख, आदर सन्मान सर्वकाही असतं, असं मानलं जातं.