Name Astrology : ‘या’ अक्षराने सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्ती असतात खूपच आनंदी; कधीच भासत नाही पैशांची कमतरता

या व्यक्तींना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. एकदा जर यांनी कोणती गोष्ट करायची ठरवली तर ते ती गोष्ट पूर्ण करूनच दाखवतात.

name-astrology
हिंदू धर्मात जन्म राशीनुसार नाव ठेवले जाते. (Photo : Jansatta)

असे म्हटले जाते, व्यक्तीच्या स्वभावावर आणि जीवनावर त्याच्या नावाचा मोठा प्रभाव पडत असतो. म्हणूनच अधिकतर लोक नावाच्या पहिल्या अक्षरावर विशेष लक्ष देतात. हिंदू धर्मात जन्म राशीनुसार नाव ठेवले जाते. आज आपण अशा अक्षरांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने सुरु होणाऱ्या नावांच्या व्यक्ती खूपच आनंदी जीवन जगतात. त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. तसेच हे लोक फारच चिवट असतात. एकदा जर यांनी कोणती गोष्ट करायची ठरवली तर ते ती गोष्ट पूर्ण करूनच दाखवतात.

दूरदृष्टी आणि नेतृत्व गुण संपन्न

ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर A, C किंवा L असते ते लोक भाग्यशाली मानले जातात. यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवड असते. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता अधिक असते. तसेच त्यांच्याकडे उत्तम दूरदृष्टी असते. या व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. आपल्या बोलण्याच्या कौशल्याने ते इतर व्यक्तींना आपल्याकडे सहज आकर्षित करून घेतात.

रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब

या व्यक्ती नेहमी आनंदी आणि सामाजिक असतात

या व्यक्ती नोकरी आणि व्यापार दोन्ही गोष्टी करू शकतात. हे लोक अतिशय साहसी असतात, तसेच कोणत्याही क्षेत्रात जोखीम उचलण्यासाठी या व्यक्ती कधीच बिचकत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असेल तरी या व्यक्ती प्रत्येक समस्येचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असतात. या व्यक्ती सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतात तसेच प्रत्येकाला मदत करण्यासाठी हे नेहमीच पुढे असतात.

Numerology : या तारखेला जन्मलेले लोक असतात अतिशय रोमँटिक बुद्धिजीवी; जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेचा यात समावेश आहे का

पैसे खर्च करायला मागे-पुढे बघत नाहीत या व्यक्ती

या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे करायला आवडते. आपलं काम करवून घेणं त्यांना बरोबर जमतं. या व्यक्ती अगदी मोकळेपणाने आपलं आयुष्य जगतात. पैसे खर्च करण्यात या व्यक्ती अजिबात मागे-पुढे पाहत नाहीत.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People with names beginning with this letter are very happy there is never a shortage of money pvp

Next Story
आजचं राशीभविष्य, मंगळवार, १८ जानेवारी २०२२
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी