Personality Analysis By Signature : स्वाक्षरीचे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महत्त्वाची कागदपत्रे अनेकदा स्वाक्षरीशिवाय अपूर्ण राहतात. प्रत्येकाची स्वाक्षरी ही वेगवेगळी असते. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने स्वाक्षरी करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, स्वाक्षरीवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. हे खरंय.
हस्ताक्षराचे विश्लेषण करून माणसाचे गुणदोष आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जाणून घेणे यालाच ग्रॅफोलॉजी म्हणतात. वेगवेगळ्या स्वाक्षरींवरून आज आपण व्यक्तींचा स्वभाव जाणून घेणार आहोत.
- जे लोक वरच्या दिशेने स्वाक्षरी करतात, ते अत्यंत आशावादी आणि आयुष्यात नेहमी प्रगती करणारे असतात आणि जे लोक स्वाक्षरी खालच्या दिशेने करतात, ते नेहमी निराश आणि दु:खी असतात.
- ज्या व्यक्तीची स्वाक्षरी स्पष्ट आणि सरळ असते, त्या व्यक्तींना नेहमी इतरांबरोबर मिळून मिसळून राहायला आवडते. खूप मोठ्या अक्षरांमध्ये स्वाक्षरी करणारे लोक खूप अभिमानी असतात. या लोकांना इतरांपेक्षा नेहमी वेगळे करायला आवडते.
- स्वाक्षरीत पहिलं अक्षर मोठं आणि बाकी नंतर लहान अक्षरं काढणारी व्यक्ती स्वभावाने खूप दयाळू असतात. ते आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप मेहनत घेतात. असे लोक राजकारणात खूप चांगलं काम करू शकतात.
- स्वाक्षरीत नावाचे आणि आडनावाचे पहिले अक्षर मोठे लिहिणारे लोकं नेहमी सामाजिक कार्यात सहभाग घेतात. समाजात यांची नेहमी प्रशंसा होते. या लोकांचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम असते. त्यांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)