Pitru Paksha 2023 All Date, Rituals and Significance : हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. त्याच वेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते. तर जाणून घेऊ या यावेळी पितृ पक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील?

पितृ पक्ष २०२३ ची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे?

या वर्षी पितृ पक्ष शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे. तर पितृ पक्षाची समाप्ती १४ ऑक्टोबर २०२३ रोजी कृष्ण पक्षाच्या अमावस्येला होईल.

३० वर्षांनी पितृपक्षात अमृत व सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने ‘या’ ५ राशींना लाभणार वाडवडिलांची कृपा; होऊ शकता श्रीमंत

पितृ पक्षाचे महत्त्व

पितृ पक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूर्वज मृत्युभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे पितृ पक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो.

दुसरीकडे पितृ पक्षातील तिथीनुसार, पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृ पक्षावर ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण करावे.

हेही वाचा – Swapna Shastra : एखाद्या मुलीला स्वप्नात तरुण मुलगा दिसणे शुभ की अशुभ? हे काय सूचित करते; जाणून घ्या …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्राद्धाच्या तारखा

२९ सप्टेंबर २०२३ – पौर्णिमा श्राद्ध
३० सप्टेंबर २०२३ – प्रतिपदा (द्वितीया श्राद्ध)
१ ऑक्टोबर २०२३ – तृतीया श्राद्ध
२ ऑक्टोबर २०२३- चतुर्थी श्राद्ध
३ ऑक्टोबर २०२३- पंचमी श्राद्ध
४ ऑक्टोबर २०२३- पष्ठी श्राद्ध
५ ऑक्टोबर २०२३- सप्तमी श्राद्ध
६ ऑक्टोबर २०२३- अष्टमी श्राद्ध
७ ऑक्टोबर २०२३- नवमी श्राद्ध
८ ऑक्टोबर २०२३- दशमी श्राद्ध
९ ऑक्टोबर २०२३- एकादशी श्राद्ध
११ ऑक्टोबर २०२३- द्वादशी श्राद्ध
१२ ऑक्टोबर २०२३- त्रयोदशी श्राद्ध
१३ ऑक्टोबर २०२३- चतुर्दशी श्राद्ध
१४ ऑक्टोबर २०२३- सर्व पितृ अमावास्या