Pitru Paksha 2025 Shradh Importance: हिंदू धर्मात पितृ पक्षाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील १५ दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते. परंतु पितृ पक्षात घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृह प्रवेश, नव्या कामाची सुरूवात केली जात नाही.

पितृ पक्ष २०२५ तारीख

यंदा पितृ पक्ष रविवार ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होणार असून, रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त होईल.

पित पृक्ष २०२५ श्राद्ध तिथी

  • ७ सप्टेंबर २०२५, रविवार- पितृ पक्ष प्रारंभ, प्रौष्ठप्रदी पौर्णिमा
  • ८ सप्टेंबर २०२५, सोमवार – प्रतिपदा श्राद्ध
  • ९ सप्टेंबर २०२५ मंगळवार- द्वितीया श्राद्ध
  • १० सप्टेंबर २०२५, बुधवार- तृतीया श्राद्ध / चतुर्थी श्राद्ध
  • ११ सप्टेंबर २०२५, गुरुवार- पंचमी श्राद्ध / महा भरणी श्राद्ध
  • १२ सप्टेंबर २०२५, शुक्रवार- षष्ठी श्राद्ध
  • १३ सप्टेंबर २०२५, शनिवार- सप्तमी श्राद्ध
  • १४ सप्टेंबर २०२५, रविवार- अष्टमी श्राद्ध
  • १५ सप्टेंबर २०२५, सोमवार- नवमी श्राद्ध
  • १६ सप्टेंबर २०२५, मंगळवार- दशमी श्राद्ध
  • १७ सप्टेंबर २०२५, बुधवार- एकादशी श्राद्ध
  • १८ सप्टेंबर २०२५, गुरुवार- द्वादशी श्राद्ध
  • १९ सप्टेंबर २०२५, शुक्रवार- त्रयोदशी श्राद्ध / मघा श्राद्ध
  • २० सप्टेंबर २०२५, शनिवार- चतुर्दशी श्राद्ध
  • २१ सप्टेंबर २०२५, रविवार- सर्वपित्री दर्श अमावस्या

पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येला खूप महत्वपूर्ण मानले जाते. जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण करू शकता.

पितृ पक्षाचे महत्व

पितृ पक्षाच्या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो, असे म्हटले जाते. या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्माणांना भोजन, दक्षिणा, वस्त्र दान केले जातात. या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती?

शास्त्रानुसार सकाळ-संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी १२ वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले गेले आहे. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात.