Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात पितृ पक्षाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी वर्षातील १५ दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. ७ सप्टेंबर २०२५ रोजी पितृ पक्षाची सुरूवात झाली असून २१ सप्टेंबर २०२५ रोजी समाप्त होणार आहे. दरम्यान, तोपर्यंतचा काळ १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असणार आहे.
‘या’ राशींसाठी पितृ पक्षाचा काळ लाभदायी
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींवर पितर नेहमीच प्रसन्न असतात. पितरांच्या आशीर्वादाने या राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळते. या काळात नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या पितरांची विशेष कृपा असते. पितर नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश देतात. या राशीचे व्यक्ती आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पिंडदान, तर्पण, श्राद्ध करतात, त्यामुळे पितर त्यांना आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमतरता भासून देत नाहीत. या राशीच्या व्यक्तींना भरपूर यश, पैसा आणि मानसन्मान मिळवून देतात.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींवरदेखील पितरांचा आशीर्वाद असतो. पितरांच्या कृपेने नेहमीच या व्यक्तींना भरपूर पैसा आणि करिअरमध्ये यश मिळते. पितृ पक्षाचा काळही या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पितरांच्या आशीर्वादाने बँक बॅलन्समध्येही मोठी वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
