Rahu Nakshatra Pada Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे. राहूचे हे परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

राहूच्या कृपेने ‘या’ तीन राशी मालामाल होणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे नक्षत्र पद गोचर खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे नक्षत्र पद गोचर लाभकारी परिणाम देईल. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)