Rahu In Revati Nakshatra: ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू राशीच्या बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्की होतो असे मानले जाते. सध्या राहू ग्रह मीन राशीत आहे. आता त्याने नक्षत्र बदलले आहे. राहू ग्रहाने रेवती नक्षत्राच्या तिसर्‍या घरात प्रवेश केला आहे. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे, बुद्धीचा दाता आहे. रेवती नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी शेवटचे नक्षत्र आहे. रेवती नक्षत्रात राहूचा प्रवेश अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार फायदे?

मेष
या राशीमध्ये राहू बाराव्या घरात राहणार आहे. या राशीच्या लोकांना सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात निर्माण होत असणाऱ्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर आयुष्याच्या जोडीदारासह तुमचे नाते चांगले होऊ शकते. दिर्घकाळापासून लग्नामध्ये निर्माण होत असललेला अडथळा दूर होईल.

हेही वाचा – २०२३ मधील शेवटच्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यक्ती जोडीदाराला करतील खुश! प्रवासाची संधी; कसा जाईल तुमचा आजचा दिवस?

मिथुन
या राशीमध्ये राहू रेवती नक्षत्रात दहाव्या घरात प्रवेश करत आहे. त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांमध्येही भाग्याची संपूर्ण साथ मिळेल, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि राहुने बुधच्या नक्षत्रातही प्रवेश केला आहे. त्याचा जीवनात सकारात्मक प्रभाव पडू शकतो. व्यवसायात अपार यशाचा लाभ मिळू शकते. त्याचबरोबर कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. त्याचबरोबर समाजात मान-संपन्नता वाढेल. बरेच दिवस अडकलेले काम पूर्ण करू शकतात.

हेही वाचा – २०२४मध्ये ‘या’ राशीच्या महिला ठरतील अत्यंत भाग्यवान; मिळेल इच्छित पदोन्नती आणि पैसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कन्या
राहू रेवती नक्षत्रात प्रवेश करून या राशीला सातव्या घरात राहील. कन्या राशीचा स्वामी देखील बुध आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनातही चांगले प्रभाव पाहायला मिळतील. जुलैपर्यंत नवीन व्यवसाय सुरू होईल, फायदा देखील होईल. तुमच्यामध्ये उत्साह वाढेल. अशा स्थिती तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. नोकरदार लोकांच्या कामाचे कौतूक होईल. पदोन्नतीसह एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल. त्याच्याबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावातून तुम्हाला मुक्ती मिळू शकते.

टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीक आहे.