Rahu in Purva Bhadrapada Nakshatra: २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:५० वाजता राहू पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदात प्रवेश करणार आहे. ‘पापी ग्रह’ म्हणून ओळखला जाणारा राहू या काळात काही राशींवर मात्र जबरदस्त मेहेरबान होणार आहे. देवगुरू बृहस्पतीच्या स्वामित्वाखालील या नक्षत्रात राहूचा प्रवेश झाल्यावर तीन भाग्यवान राशींच्या जीवनात मोठे बदल होणार असून, संपत्ती, आरोग्य, नातेसंबंध आणि यशाचे नवे मार्ग खुलणार आहेत. कोणत्या आहेत या ३ राशी? पाहूया सविस्तर…
‘या’ तीन राशींवर बरसणार कृपा, सर्व स्वप्नं होतील पूर्ण?
मेष
हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी घेऊन येणारा ठरू शकतो. राहूची कृपा मिळाल्याने धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडू शकतात. युवांना व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास येईल. घरातील कलह दूर होऊन नातेसंबंध अधिक गहिरे होतील. संपत्तीच्या खरेदीसाठीही योग्य काळ सिद्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे आरोग्य सुधारेल आणि जुन्या अडचणी हळूहळू दूर जातील. सप्टेंबरच्या अखेरीस ही रास उत्तम फळांचा अनुभव घेईल.
तूळ
राहूचा हा गोचर तूळ राशीसाठी खास फायदेशीर ठरू शकतो. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात झळाळी येईल. आत्मविश्वास वाढेल आणि जुने व्यापारी भागीदार पुन्हा साथ देतील. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो; तर नोकरी पेशामुळे लोकांसाठी पदोन्नती किंवा नव्या संधींची शक्यता वाढेल. ज्या समस्यांनी डोकेदुखी वाढवली होती, त्या हळूहळू संपुष्टात येऊ शकतात. सप्टेंबर महिना तूळ राशीवाल्यांसाठी यशाचे नवे दालन उघडणारा ठरू शकतो.
कुंभ
या कालावधीत कुंभ रास असलेल्या लोकांवर लाभदायी गोष्टींचा वर्षाव होणार आहे. राहूच्या या प्रवेशामुळे नव्या लोकांशी भेटीगाठी होतील आणि व्यापाऱ्यांना नवे करार व संधी मिळू शकतात. लांबच्या प्रवासाचे योग जुळतील. रचनात्मक काम करणाऱ्या लोकांना विशेष यश लाभू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल, तर एकूणच हा काळ करिअर आणि वैयक्तिक आयुष्यासाठीही उत्तम ठरू शकतो.
एकूणच २१ सप्टेंबरनंतर राहूचा पद नक्षत्र गोचर मेष, तूळ व कुंभ राशींसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे संकटं मागे पडतील, नवे मार्ग खुलतील आणि भाग्याचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडतील.
तुमची रास त्यात आहे का? मग तयार राहा भाग्याच्या नव्या अध्यायासाठी!
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)