Rahu Nakshatra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात राहूला छाया ग्रह मानलं जातं. अनेकदा तो गूढ, अनपेक्षित आणि रहस्यमय परिणाम घडवतो. मात्र, या वेळी त्याचा बदल वेगळाच आहे. तब्बल १० वर्षांनंतर राहू स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करत आहे आणि हा अद्भुत बदल होणार आहे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी. या दिवशी आकाशातील ग्रहस्थितीत होणाऱ्या या हालचालींकडे ज्योतिष जाणकारांचे डोळे लागले आहेत. कारण, या संक्रमणामुळे काही राशींवर राहूची खास कृपा होणार असून त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडणार आहेत.

शतभिषा नक्षत्रात राहूचा गोचर नेहमीच रहस्यांनी वेढलेला असतो. या काळात काही जणांना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागतो, तर काहींचं भाग्य अक्षरशः गगनाला भिडतं. यावेळी मात्र राहूचा प्रभाव ३ राशींवर अत्यंत सकारात्मक राहणार आहे. विशेषत: करिअर, व्यवसाय, मान-सन्मान आणि आर्थिक बाबतीत या राशींचा उदयकाळ सुरू होणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

राहूच्या नक्षत्र बदलामुळे ‘या’ राशींवर होणार धनसंपत्तीचा वर्षाव?

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येणारा ठरू शकतो. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे आता तुम्हाला फळ मिळू शकते. अडकलेली कामे या काळात पूर्णत्वास जाऊ शकतात. नोकरीत बढतीची दारे उघडू शकतात, व्यवसायात मोठे करार मिळू शकतात. अचानक धनलाभ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुमच्या कष्टांचं फळ आता मिळणारच आहे.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी राहूचा हा बदल खास वरदान ठरणार आहे. करिअरमध्ये तो सुवर्णसंधी घेऊन येणारा ठरू शकतो, प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात मान-सन्मान मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होऊ शकतो. व्यावसायिकांना प्रचंड नफा मिळू शकतो. या काळात घरात शुभवार्ता ऐकायला मिळण्याचीही शक्यता प्रबळ आहे.

कुंभ

कुंभ राशीचे भाग्य या काळात अक्षरशः खुलून येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या प्रचंड स्थैर्य येईल, नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या जबाबदाऱ्या येतील आणि त्यातून यश नक्की मिळू शकेल. अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ आहे. जीवनात मोठे सकारात्मक बदल घडताना दिसतील.

२३ नोव्हेंबर २०२५ रोजी राहूचा शतभिषा नक्षत्रातील गोचर हा केवळ खगोलशास्त्रीय बदल नाही, तर तो काही राशींसाठी जीवनाला नवीन दिशा देणारा ठरेल. मिथुन, कर्क आणि कुंभ राशीचे लोक सज्ज व्हा, कारण पुढील काळ तुमच्या यश, कीर्ती आणि समृद्धीचा नवा अध्याय लिहिणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)