ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे ग्रहांचे विश्लेषण करून भविष्य सांगितले जाते, त्याचप्रमाणे सामद्रिकशास्त्रात मानवी शरीरावरील चिन्हे, अवयवांची रचना या गोष्टींच्या आधारे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितले जाते. पायावर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असण्याचे अर्थही वेगवेगळे असतात. पायावरील तीळ व्यक्तीच्या स्वभावाबद्दल माहिती सांगतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, पायावर असलेले तीळ माणसाच्या आयुष्याशी संबंधित रहस्येही उघड करतात. पायावर तीळ असल्याचे काय अर्थ आहेत, ते जाणून घेऊया.
कला प्रेमी –
पायाच्या उजव्या मांडीवर तीळ असणारी व्यक्ती खूप कलात्मक असते. सामद्रिकशास्त्रानुसार, अशा लोकांना स्वयंपाक करणे आणि खाणे खूप आवडते. हे लोक कायम आनंदी मानले असतात. तसेच ते कला प्रेमी आणि कला जाणकार असतात. त्यांची समाजात वेगळी ओळख असते.
आकर्षक व्यक्तिमत्व –
जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या पायाच्या वरच्या भागावर म्हणजेच उजव्या मांडीवर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप कामुक आहे, असं मानलं जातं. असे लोक खूप आकर्षक असतात, त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडतं. त्यांना फिरायला आवडतं आणि जिथे जातात तिथे आपली छाप सोडतात.
डाव्या गुडघ्यावर तीळ असल्यास-
ज्या लोकांच्या डाव्या गुडघ्यावर तीळ असतो, ते खूप भावुक असतात. असे लोक प्रामाणिक आणि लवकर मैत्री करणारे असतात. ते इतरांशी मोकळेपणाने बोलतात आणि समोरच्याकडूनही तशीच अपेक्षा करतात, असं सामद्रिकशास्त्रात म्हटलं आहे.
शांत स्वभाव –
उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली आणि टाचेच्या वर तीळ असेल तर असे लोक साहसी असल्याचं मानलं जातं. त्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा असतो. तसेच, हे लोक जीवनात शांतता शोधतात. शांततेसाठी ते काहीही करायला तयार असतात. असे लोक प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी व शांत राहतात.
धैर्यवान आणि निर्भय:
सामद्रिकशास्त्रानुसार ज्या लोकांच्या उजव्या गुडघ्यावर तीळ असतो, असे लोक धैर्यवान आणि निर्भय असतात. असे लोक सैनिक आणि पोलीस होतात. ते खूप असंवेदनशील व हट्टी स्वभावाचे असतात. त्यांना अहंकार असतो, एखाद्याच्या बोलण्याने ते लगेच दुखावले जातात आणि या लोकांना लगेच राग येतो.