Sankashti Chaturthi 2024 : दर महिन्याला कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पूजा आराधना केली जाते. आज ही संकष्टी चतुर्थी असून त्रिग्रही योग, शोभन योग आणि मघा नक्षत्र सह अनेक शुभ संयोग जुळून आले आहे ज्यामुळे या संकष्टीला राशीचक्रातील काही राशींना चांगला फायदा होऊ शकतो. त्यांची आर्थिक वृद्धी होऊ शकते. गणपतीच्या कृपेने काही लोकांना कामामध्ये यश मिळू शकते. जाणून घेऊ या संकष्टी चतुर्थीला कोणत्या राशींना फायदा होईल.

मेष राशी

राशीचक्रातील पहिली रास म्हणजे मेष. मेष राशीच्या लोकांना ही संकष्टी चतुर्थी लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक वृद्धी होईल. कमावण्याच्या स्त्रोत वाढतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. कौटूंबिक जीवनात यश मिळेल.

मिथुन राशी

या संकष्टी चतुर्थीला मिथुन राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात वाढ होईल. या लोकांची खास व्यक्तींबरोबर भेटी गाठी होण्याची शक्यता आहे. प्रियजनांबरोबरचे यांचे प्रेम संबंध दृढ होऊ शकतात. धनसंपत्तीशी संबंधित समस्या दूर होतील. या संकष्टी चतुर्थीचा मिथुन राशीला चांगला फायदा होणार आहे.

हेही वाचा : Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना ही संकष्टी चतुर्थी लाभदायक ठरणार आहे. या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सामाजित क्षेत्रात पद प्रतिष्ठा वाढेल. ऑफिसच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकते.

वृश्चिक राशी

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. कौटूंबिक जीवनात सुख समृद्धी लाभेल.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. या राशीच्या लोकांचे खूप काळापासून अडकलेले काम मार्गी लागतील. शैक्षणिक कामात यश मिळेल. या लोकांचे आर्थिक वाद मिटतील आणि यांच्या धनसंपत्तीत वाढ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)