Dainik Rashi Bhavishya In Marathi, 14 July 2025: आज १४ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. संध्याकाळपर्यंत ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग जुळून येईल. उद्या सकाळपर्यंत म्हणजेच ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पाच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का जाणून घेऊया…

१४ जुलै २०२५ पंचांग व राशिभविष्य ( Dainik Mesh To Meen Rashi Bhavishya, 14 July 2025 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आवडते खाद्यपदार्थ खाल. सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल. पैशाची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी. गोड बोलण्याने इतरांवर छाप पाडाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. उत्तम शय्यासौख्य लाभेल. हातातील कामाला यश मिळेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. पि‍छेहाटीला घाबरून जाऊ नका. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. व्यावसायिक स्तरावर खुश राहाल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

विशाल दृष्टीकोन बाळगावा. तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. परोपकाराचे महत्त्व पट‍वून द्याल. लेखनाचे कौतुक केले जाईल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील. वारसाहक्काच्या कामांना गती येईल. सासुरवाडीची मदत घेता येईल. व्यापारी वर्ग खुश राहील.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

एकमेकांचे विचार जाणून घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. क्षुल्लक गोष्टी क्रोधाला कारणीभूत ठरू शकतात.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेऊ नका. काही गोष्टींना मुरड घालावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. दिवस सुस्तपणात घालवाल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल. प्रेमभावना वाढीस लागेल. नवीन ओळखी वाढतील. त्यातूनच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

साहित्याची आवड जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल. डोकेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर