Sarva Pitru amavasya 2025 Graha Gochar: हिंदू धर्मामध्ये सर्वपित्री अमावस्येला खूप महत्वपूर्ण मानले जाते. अनंत चतुर्दशनंतर पितृपक्षाची सुरूवात होते. असे मानले जाते की, या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो.

पंचांगानुसार, पितृ पक्ष ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झाला असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणार आहे. २१ सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्वपित्री अमावस्या असेल. तसेच याच दिवशी सूर्यग्रहणदेखील असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी चंद्राचे राशी परिवर्तन होईल, चंद्र दुपारी ३ वाजून ५७ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच बुधाचे नक्षत्र परिवर्तन होईल. बुध हस्त नक्षत्रामध्ये याच दिवशी मध्यरात्री १२ वाजून ५६ मिनिटांनी प्रवेश करेल. चंद्र आणि बुधाच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्वपित्री अमावस्येला नक्कीच काही लोकांवर पडेल.

सर्वपित्री अमावस्येचा दिवस तीन राशींवर वरदान

कन्या (Kanya Rashi)

सर्वपित्री अमावस्या कन्या राशीसाठी लाभदायक ठरू शकते. तुम्हाला पूर्वज आणि ग्रहांचे भरपूर आशीर्वाद मिळतील. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. करिअरमध्ये आणि व्यवसायात जी काही आव्हाने येत असतील, ती तुम्ही पार करून यशाची शिखरे गाठाल. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वपित्री अमावस्येला होणारे चंद्राचे राशी परिवर्तन अत्यंत लाभदायी ठरेल. यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच सर्वपित्री अमावस्ये कर्क राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. कला क्षेत्राशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ खूप छान असणार आहे. तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी सर्वपित्री अमावस्या खूप शुभ राहील. तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभाचे योग बनतील. तसेच गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच, ज्या लोकांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्कृष्ट सिद्ध होऊ शकतो. यासह रखडलेली सर्व कामे मार्गी लावली जातील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)