Shash Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत शनीच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांवर जास्त असतो. ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मदेवता म्हटलं आहे. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार त्याचे फळ देतो. शनि ग्रह सध्‍या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. शनिदेवाने याच राशीच शश राजयोगही निर्माण केला आहे. २०२५ पर्यंत शनिदेव याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात अपार सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींवर असणार शनिदेवाची कृपा?

तूळ राशी

शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना जीवनात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. तसेच शेअर मार्केट आणि शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. धनलाभ होण्याची अधिक शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागू शकतात. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. अगदी तुमच्या जोडीदाराच्या सुद्धा प्रगतीचे शुभ योग आहेत. 

(हे ही वाचा : ३७१ दिवस ‘या’ राशींच्या धन व बँक बॅलन्समध्ये होणार झपाट्याने वाढ? देवगुरु अधिक बलवान होऊन देऊ शकतात चांगला पैसा)

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहू शकते. यावेळी नशीब तुम्हाला साथ देऊ शकतो. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. या काळात केलेली गुंतवणूक तुमच्या संपत्तीत वाढ करणारी ठरु शकते. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. 

कुंभ राशी

शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. तुम्हाला मोठे पद आणि मोठा पगार मिळू शकतो. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासातून नवीन संधी आणि नवीन ओळखी ही भविष्यात खूप जास्त फायदेशीर ठरु शकते. रखडलेले पैसे मिळू शकतात. तसेच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)