Kendra Tirkon Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून राजयोग निर्माण करतात. येत्या नवीन वर्षांत म्हणजेच २०२४ मध्ये अनेक शुभ राजयोग तयार होणार आहेत. यात शनिदेवाचाही समावेश आहे. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी म्हणजे स्वगृही कुंभ राशीत सध्या विराजमान आहेत. शनिदेव स्वराशीत असल्यामुळं शश राजयोगाव्यतिरिक्त ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ तयार होत आहे. जवळपास दहा वर्षांनंतर शनिच्या स्थितीमुळे नवीन वर्षात हा शुभ राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसणार असून खास करुन तीन राशींवर याचा शुभ परिणाम दिसून येऊ शकतो. काही राशींना शनिदेवाच्या कृपेने चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. त्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार धनलाभ?

सिंह राशी

केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. वर्ष २०२४ च्या सुरुवातीला तुमचे करिअर आणि व्यवसाय चमकू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरू शकते. शनिदेवाच्या कृपेने अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे.

(हे ही वाचा : जन्मापासूनच कन्यासह ‘या’ ३ राशींच्या मुली वडिलांसाठी भाग्यशाली सिद्ध होतात? लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येते दारी? )

वृश्चिक राशी

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन वर्षात मोठे बदल होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. यामुळे तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळून भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहू शकते. कुटुंबात सुख-शांति नांदू शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने शनिदेवाच्या कृपेने सर्व बाजूंनी शुभवार्ता मिळू शकतात. नववर्षात तुमच्याकडे पैशाची आवक वाढू शकते. तुम्हाला नवीन व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. या काळात केलेल्या गुंतवणूकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. एकतर लग्न निश्चित होऊ शकते किंवा लग्नाचा चांगला प्रस्तावही मिळू शकतो. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)