Shani uday in meen rashi: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो.

येत्या काही दिवसात शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान असून २९ मार्च रोजी रात्री १० वाजून ७ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तसेच त्यानंतर ६ एप्रिल २०२५ रोजी मीन राशीत उदित होणार आहे. ज्याचा फायदा १२ राशींपैकी काही राशींच्या आयुष्यावर झालेला पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशी होणार मालामाल

मेष

शनीचा मीन राशीतील उदय मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीचा उदय खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनाही शनीच्या उदित अवस्थेने अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)