Gajakesari Rajyog 2025: श्रावण महिना म्हणजे भक्तीची तीव्रता आणि त्या भक्तीतही सर्वात खास दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील शिवरात्री. या दिवशी महादेवाचे भक्त विधीपूर्वक भगवान शिवाची पूजा करतात आणि उपवासदेखील करतात. असे केल्याने भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद भक्तांवर राहतात, असं मानलं जातं. २३ जुलै २०२५ या दिवशी साजरी होणारी श्रावण शिवरात्री यंदा खास ठरणार आहे, कारण यंदा जवळपास १०० वर्षांनंतर या पवित्र दिवशी गुरु आणि चंद्र यांच्या संयोगाने ‘गजकेसरी राजयोग’ तयार होतोय, जो अत्यंत शुभ आणि भाग्यवर्धक मानला जातो. वैदिक ज्योतिषानुसार हा योग अत्यंत दुर्मीळ असून तो काही निवडक राशींना अचानक भाग्योदय आणि धनलाभाचे प्रबळ योग देणारा आहे. चला पाहूया, कोणत्या राशींचं नशीब उजळण्याची शक्यता आहे.
‘या’ राशींचं बंद दरवाजे उघडणार, घरात येईल पैसा आणि सुख-समृद्धी!
वृषभ (Taurus)
वृषभ राशीसाठी गजकेसरी राजयोग लग्नभावात बनतोय, जो तुमचा आत्मविश्वास वाढवेल. या काळात अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमची वाणी लोकांवर प्रभाव टाकेल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना चांगली नवीन नोकरी मिळू शकते. विशेषतः मार्केटिंग, बँकिंग, मीडिया आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही संधी सुवर्णसंधी ठरू शकते. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह (Leo)
सिंह राशीसाठी हा राजयोग फारच लाभदायक ठरू शकतो, कारण हा योग लाभ स्थानात तयार होतो आहे. जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जुने प्रॉपर्टी वाद मिटतील आणि मानसिक शांती मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. पूर्वीच्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग जुळू शकतात. संपत्ती आणि समृद्धी वाढेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल.
तूळ (Libra)
तूळ राशीसाठी हा राजयोग भाग्य स्थानात तयार होत असल्याने, भाग्याचे चक्र फिरणार हे निश्चित. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. कामानिमित्त प्रवास, धार्मिक कार्यक्रमात सहभाग किंवा कोणत्यातरी मोठ्या स्पर्धेत यश मिळण्याचे संकेत आहेत. तुमचं संवाद कौशल्य आणि वाणी यामध्ये सुधारणा होईल, ज्यामुळे समाजात तुमचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकाल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे आता मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भौतिक सुख-सुविधा मिळतील. कुटुंबात सुख-शांती राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)