September Month Graha Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिना अत्यंत खास असणार आहे. कारण- या महिन्यात नवग्रहातील काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. पंचांगानुसार, १३ सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याचदरम्यान, मंगळ चित्रा आणि स्वाती नक्षत्रात गोचर करेल. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये जाईल. तसेच बुध ग्रह सप्टेंबर महिन्यात सिंह आणि कन्या राशीत गोचर करेल आणि मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रात गोचर करेल. तसेच दैत्यगुरू शुक्राचार्य कर्क आणि सिंह राशीत राहतील आणि आश्लेषा, मघा आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये गोचर करतील.

देवगुरू बृहस्पती संपूर्ण महिना मिथुन आणि पुनर्वसु नक्षत्रामध्ये राहील. तसेच शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आणि उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करेल. केतू सिंह राशीसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात राहतील. तसेच राहू कुंभ राशीसह पूर्वाफाल्गुवू नक्षत्रात विराजमान असेल. या ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

सप्टेंबर महिना ‘या’ राशींसाठी भाग्यदायी

मेष (Mesh Rashi)

हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कर्क (Kark Rashi)

सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही मे महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

मिथुन (Gemini Rashi)

मिथुन राशींच्या व्यक्तींसाठीही हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)