Shani-Arun Triekadash Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, शनी मीन राशीत स्थित असून अरूण ग्रह वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. हे दोन्ही ग्रह मिळून त्रिकादश योग निर्माण करत आहेत. १२ ऑगस्ट २०२५ रोजी एकमेकांपासून ६० डिग्रीवर असतील. त्यामुळे शनी-अरूण ग्रहाचा त्रिएकादश योग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.
‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि अरुण या ग्रहांनी निर्माण केलेला त्रिकादश योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
वृश्चिक (Vruschik Rashi)
हा योग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. नवीन वस्तू खरेदी कराल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल. आनंदी वार्ता कानी पडतील. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)