Shani Gochar January 2023: जानेवारी महिन्याच्या ३० तारखेला शनिदेव अस्त होणार आहेत. ज्याचे लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतील. जाणून घेऊया शनिदेवाच्या अस्तामुळे कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्रानुसार, ३० जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:०६ ते ६ मार्च २०२३ रात्री ११:३६ पर्यंत शनिदेव अस्त अवस्थेत असतील. यानंतर शनिदेव १७ जून २०२३ रोजी रात्री १०.४८ वाजता वक्री होतील. तर ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.२६ वाजता मार्गी होतील.

‘या’ राशींची शनि साडेसातीपासून होईल सुटका (Shani Asta 2023)

शनिदेवाच्या या गतीने धनु राशीच्या लोकांना शनि साडेसतीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबत शनिदेव तुम्हाला धनलाभाची संधी देखील उपलब्ध करून देतील. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा तिसरा चरण सुरू होऊ शकतो. दुसरीकडे, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनि साडेसातीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीच्या लोकांसाठी शनि साडेसतीचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो.

‘या’ राशींना शनिदेवाच्या साडेसाती धैय्या पासून मुक्ती मिळू शकते (Shani Asta 2023)

शनिदेवाच्या या गतीने तूळ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळू शकते. यासोबतच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला यावेळी पैसे मिळण्याची देखील शक्यता दिसत आहे.

( हे ही वाचा: १ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शुक्राच्या प्रवेशाने तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत)

दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिच्या धैय्याचा प्रभाव संपल्यानंतर कर्क राशीच्या लोकांसाठी शनि साडेसती सुरू होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)