scorecardresearch

Premium

शनीदेव शश, धन व केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ राशींना करतील करोडपती? १४० दिवस मिळू शकते नशिबाला कलाटणी

Shani Vakri: १७ जूनला शनिदेव पूर्ण वक्री स्थितीत असणार आहेत तर पुढील १४० दिवस शनी महाराज कुंभ राशीतच वक्री राहणार आहेत. या कालावधीत शनी कृपेने तीन राजयोग तयार होत आहेत.

Shani Dev Makes Three Rare Rajyog In Kundali Of These Zodiac Signs Next 140 days Can Earn Crores Of Money Astrology News
शनी देवांची १४० दिवस 'या' राशींवर राहील कृपा? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Vakri In June 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देव हे कलियुगातील न्यायाधिकारी मानले जातात. जानेवारी महिन्यात शनिदेव तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत गोचर करून स्थिर झाले होते. यानंतर शनीचा अस्त व उदय सुद्धा मार्च महिन्यात झाला होता. आता वैदिक ज्योतिष अभयस्कांच्या माहितीनुसार जून महिन्यात तब्बल ६ महिन्यांनीं शनीदेव वक्री होणार आहेत. १७ जूनला शनिदेव पूर्ण वक्री स्थितीत असणार आहेत तर पुढील १४० दिवस शनी महाराज कुंभ राशीतच वक्री राहणार आहेत. या कालावधीत शनी कृपेने तीन राजयोग तयार होत आहेत. यामध्ये केंद्र त्रिकोण राजयोग, शश महापुरुष राजयोग व धन राजयोग बनल्याने येत्या काळात काही राशींसाठी प्रचंड मोठी लाभाची संधी तयार होण्याची चिन्हे आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कशाप्रकारचा फायदा होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया …

शश, धन व केंद्र त्रिकोण राजयोगाने ‘या’ राशींना करतील करोडपती?

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ ही शनीच्या स्वामित्वाची रास मानली जाते. अशातच शनीदेव स्वतः आता कुंभ राशीत वक्री होणार असल्याने तुम्हाला लाभदायक काळ अनुभवता येऊ शकतो. धन राजयोग आपल्या कुंडलीत धनलाभाचा योग तयार करत आहे तर शश व केंद्र त्रिकोण राजयोगाने आपल्या संबंधांना व आरोग्याला मदत होऊ शकते. या कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्वाला व विशेषतः स्वभावात बदल घडून येऊ शकतात. तुमच्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहील अशा प्रकारची एखादी घटना लवकरच घडू शकते. तुम्हाला पार्टनरची साथ लाभू शकते ज्यामुळेतुम्ही एखादी नवी गुंतवणूक किंवा खरेदी करू शकता.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

मिथुन रास (Gemini Zodiac)

शश महापुरुष राजयोग हा आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी तयार होत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला वाहन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीची संधी मिळू शकते. तुम्हाला जुन्या इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा मोठा धनलाभ होऊ शकतो. धन राजयोग बनल्याने तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग घडण्याची चिन्हे आहेत ज्यातून तुमच्या भाग्यात तिहेरी लाभाची स्थिती तयार होऊ शकते. पुढील दोन महिने तुमचे ग्रहबल अत्यंत मजबूत असल्याने तुम्हाला स्वप्नपूर्तीच्या संधी मिळू शकतात. आईच्या व वडिलांच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो. विनाकारण तुमच्याशी गोड वागणाऱ्यांपासून तसेच विनाकारण वाद घालणाऱ्यांपासून सुद्धा सावध रहा.

हे ही वाचा<< ‘या’ ५ राशी स्वतःची चूक असूनही दुसऱ्यांनाच दोषी ठरवतात? चिडचिड व रागामागे असू शकतो ‘हा’ समज

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कर्क राशीत शुक्र व गुरु विराजमान असल्याने येत्या काही महिन्यामध्ये तुमच्या राशीला चारही बाजूंनी लाभाची चिन्हे आहेत. कुटुंबासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. शनी कृपेने केंद्र त्रिकोण राजयोग आपल्या कुंडलीत तयार होत असल्याने एखाद्या नव्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास फायदा होऊ शकतो. समाजात मान- सन्मान वाढीस लागू शकतो. तुमचे खर्च वाढतील पण बहुतांश खर्च हा तुमच्या सुख सोयी व गरजांसाठी करावा लागेल त्यामुळे कुठेच वायफळ पैसे गमावल्याची भावना बाळगू नये. यामुळेच तुम्हाला मानसिक सुख व समाधान अनुभवता येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani dev makes three rare rajyog in kundali of these zodiac signs next 140 days can earn crores of money astrology news svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×