Shani Dev Vakri In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करत असतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. यात शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाचे स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. यात २९ जून रोजी शनिदेव कुंभ राशीत वक्री करणार आहे. म्हणजेच उलटी चाल करणार आहेत. २९ जूनच्या रात्री १२.३५ वाजता शनि स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री होतील, १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री राहतील. शनिच्या या उलट्या चालीमुळे काही राशींवर विशेष कृपा असणार आहे. म्हणजेच या राशींना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळू शकते. चला तर या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घेऊ

मकर

शनिदेवाची वक्री चाल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्याचा परिणाम तुमच्या बोलण्यात दिसून येईल. तिथे तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. तसेच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तसेच या काळात व्यावसायिकांचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रिय असलेल्यांना यश मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani dev vakri in kumbh saturn vakri in aquarius these three zodiac sign big success in life sjr
First published on: 07-04-2024 at 17:51 IST