Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा कर्मदाता आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. नऊ ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्ष लागतात. शनि ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम हा १२ राशींवर दिसून येतो. आता शनिदेव आपल्या  मूळ त्रिकोण राशी, म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे ‘शश राजयोग’ निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांचं नशीब उजळू लागतं. या राजयोगामुळे व्यक्तीला सर्व सुख-सुविधा, मान-सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते. असे म्हटले जाते. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. त्यांना अमाप पैसा, सुख मिळण्याची शक्यता आहे, चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

शनिदेव ‘या’ राशींना देणार बक्कळ पैसा?

वृश्चिक राशी

शश राजयोग बनल्याने वृश्चिक राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने मोठा लाभ होऊ शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर होऊन प्रगती होऊ शकते. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 2024 saturn transit in aquarius make shash rajyog these zodiac sing can get huge money pdb
First published on: 17-04-2024 at 19:25 IST