Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कर्म व न्याय देवता मानले जातात. शनीदेवांच्या स्थितीला खूप महत्त्व आहे. वैदिक पंचांगानुसार, शनीदेव नक्षत्र बदल करणार आहेत. २८ एप्रिल रोजी सकाळी ७:५२ वाजता शनीदेव एक अतिशय विशेष खगोलीय बदल घडवून आणणार आहेत. शनीदेव उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील. शनी स्वतःच्या नक्षत्रात आल्याने २७ वर्षांनंतर शनीचे उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण ही एक दुर्मीळ ज्योतिषीय घटना आहे. शनी स्वतःच्या नक्षत्रात आल्यामुळे काही राशींच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. त्यांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे, तर जाणून घेऊयात या भाग्यशाली राशी कोणत्या…
‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे भ्रमण वृषभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या लोकांना आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. करिअर किंवा व्यवसायात तुम्ही प्रगती करणार असून पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. प्रत्येक कामात यश मिळू शकते. पैशांची कमतरता तुम्हाला या काळात भासणार नाही.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. परदेशातून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येऊ शकते.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करत असल्याने कर्क राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात. उच्च शिक्षण आणि करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी लाभू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होणार असून बँक बॅलेन्स तगडा होण्याची शक्यता आहे
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे भ्रमण मकर राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, तुमचे कुटुंबातील सर्व सदस्यांशी चांगले संबंध असतील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, उत्तराभाद्रपद नक्षत्रात शनीचे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगला लाभ मिळणार आहे. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)