Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. नवग्रहातील न्यायदेवता शनी अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या शनी मीन राशीत विराजमान असून १३ जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून तो २८ नोव्हेंबरपर्यंत याच अवस्थेत असेल. शनीच्या या अवस्थेचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशींवर असणार शनीची विशेष कृपा

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीच्या वक्री चालीचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

मकर (Makar Rashi)

शनीच्या वक्री चालीचा मकर राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींवरही शनीच्या वक्री चालीचा सकारात्मक प्रभाव पडेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)