Shani Gochar and surya grahan 2025: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि कुकर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो.

२९ मार्च २०२५ रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार असून याच दिवशी मीन राशीमध्ये २०२५ चे पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनासह सूर्यग्रहण लागणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनी यांच्यात पिता-पुत्राचे नाते असले तरीही या दोघांमध्ये शत्रुत्व भाव आहे. सूर्य आत्मा, पिता आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह असून शनी न्याय, जबाबदारी आणि प्रशासनाचा कारक ग्रह आहे. परंतु आता या दोघांची ही स्थिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते.

शनी-सूर्य तीन राशींना करणार मालामाल

वृषभ

शनी या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी असून आता तो अकराव्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना देखील या काळात धनलाभाचे संकेत मिळतील. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

कर्क

शनीचे गोचर आणि सूर्यग्रहणाचा कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा होईल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.

कुंभ

शनीच्या राशी परिवर्तनाचा आणि सूर्यग्रहणाचा तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात करा. आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)