वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. तसेच शनिदेव कुंभ आणि मकर राशीचा स्वामी आहे. तसेच शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा ढैय्या आणि साडेसातीचा प्रभाव काही राशींवर सुरू होतो आणि काही राशींवरील संपतो. अशातच आता शनिदेव जूनमध्ये वक्री झाले आणि सप्टेंबरमध्ये ते मार्गी होणार आहेत. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील. या भाग्यवान ३ राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
मिथुन रास (Mithun Zodiac)
शनिदेवाचे मार्गी होणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतून शनिदेव भाग्य स्थानी मार्गी होणार आहेत. तसेच ते आठव्या स्थानाचा स्वामी आहेत. त्यामुळे हा काळ संशोधनाशी निगडीत लोकांसाठी शुभ ठरु शकतो. तसेच तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तुम्ही सहलीला जाण्याची योजना करू शकता, जिथे नवीन लोकांशी भेट होऊ शकते. कामे पूर्ण करण्यासाठी भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी यश मिळू शकते.
तूळ रास (Tula Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची सरळ चाल शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी मार्गी होणार आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाची या काळात प्रगती होऊ शकते. तसेच, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानाचे स्वामी आहेत. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. त्याच वेळी, आपण या कालावधीत कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकतात. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे.
कन्या रास (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे मार्गी होणे अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून सहाव्या स्थानी मार्गी होणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. यासोबतच तुमच्या साहस आणि शौर्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कौटुंबिक वातावरणाच्या दृष्टीने हा काळ चांगला जाऊ शकतो. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हे गोचर खूप चांगले ठरु शकते. या काळात तुमचे उत्पन्नही वाढू शकते, तसेच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)