Shani-Guru Vakri in November 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. २०२५ हे संपायला अजून चार महिने बाकी असून उरलेल्या या चार महिन्यात मोठ्या ग्रहांचे गोचर होईल. शिवाय काही ग्रह वक्री किंवा अस्त देखील होतील. ग्रहांच्या या स्थितीचा नेहमीच १२ पैकी काही राशींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो.

पंचांगनुसार, गुरू ग्रहाला ज्ञान, सुख-संपन्नता, भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह आहे. ११ नोव्हेंबर रोजी गुरू ग्रह रात्री १० वाजून ११ मिनिटांनी कर्क राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर याच महिन्यात २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी शनी मीन राशीत वक्री होणार आहे. शनीला न्यायप्रिय आणि कर्मफळदाता म्हटले जाते. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो, परंतु याकाळात तो वक्री आणि अस्तदेखील होतो. या दोन्ही ग्रहांचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभदायी असेल.

शनी आणि गुरूची वक्री अवस्था तीन राशींना करणार मालामाल

कुंभ (Vrushabh Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूच्या वक्री अवस्थेचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

मिथुन (Mithun Rashi)

शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींवरही शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा सकारात्मक प्रभाव पडेल.हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)