Shani Jayanti 2024 : शनि जयंतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिचा जन्म झाला होता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात. जेव्हा शनि त्याची चाल बदलतो, तेव्हा काही राशींवर चांगले परिणाम तर काही राशींवर वाईट परिणाम दिसून येतात. यंदा ६ जून रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे.वैदिक पंचागनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीची सुरूवात ५ जून २०२४ ला सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी होणार आणि अमावस्या तिथी ६ जून सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होणार. त्यामुळे शनि जयंती ही ६ जूनला साजरी केली जाईल. यंदा शनि जयंतीच्या दिवशी स्वत:च्या कुंभ राशीमध्ये राहील. शनि जयंतीच्या दिवशी पाच राशींवर शनिची कृपा दिसून येईल. या लोकांना धन संपत्ती, आनंद दिसून येईल. हे लोक नोकरी, व्यवसायात प्रगती करेन. जाणून घ्या, त्या कोणत्या राशी आहेत ?

मेष

मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होऊ शकतो. या लोकांना पदोन्नती मिळू शकते आणि यांची मनाप्रमाणे बदली होऊ शकते. या लोकांचे नेटवर्क वाढेन. या लोकांनी कोणाबरोबरही कडू बोलू नये, तरच तुमचा हा काळ चांगला जाईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि लाभदायक ठरू शकतो. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. करिअरमध्ये उंची गाठू शकणार. या लोकांना कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील.

हेही वाचा : Lucky Zodiac Signs : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, शनि, सूर्य अन् मंगळ ग्रहामुळे पडणार पैशांचा पाऊस

मिथुन

मिथुन राशीसाठी ही शनि जयंती उत्तर राहील. या राशीच्या लोकांनी कोणतेही काम घाईने करू नये तरच त्यांना फायदा होईल. कोणतेही चुकीचे कार्य करू नये. या लोकांन आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या डिल मिळू शकतात.

कन्या

कन्या राशीवर शनिदेवाची कृपा दिसून येईल. शनि देव या राशीच्या लोकांचा बँक बॅलेन्स वाढवेल. प्रॉपर्टीची खरेदी करणार. अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांना कोणतीही गोड बातमी मिळू शकते. या लोकांची हरवलेली वस्तू परत मिळू शकते. कुटुंबात सुख समृद्धी लाभेल.

वृश्चिक

वृश्चिर राशीच्या लोकांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरेल. यांना धनसंपत्तीची कमतरता जाणवणार नाही. शनिच्या कृपेमुळे कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. व्यवसाय चांगला चालेल. गुंतवणूकीतून फायदा मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)