Saturn Direct 2023: शनीदेव हे कलियुगातील न्यायदेवता व दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनिदेव करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपवास, व्रत- वैकल्य सुद्धा करतात. शनी हा अत्यंत संथ गतीने चालणारा ग्रह असल्याने एखाद्या राशीत त्यांचा प्रभाव हा किमान अडीच ते कमाल साडेसात वर्ष पाहायला मिळतो. २०२३ हे वर्ष शनीच्या सर्वात महत्त्वपूर्ण बदलांसाठी ओळखले गेले आहे.
यावर्षीच्या सुरवातीला तब्बल ३० वर्षांनी शनिदेव स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेऊन स्थिर झाले होते त्यानंतर काही वेळा शनीचा उदय, अस्त झाला होता. आता शनिदेव वक्री अवस्थेत आहेत तर येत्या ४ नोव्हेंबर शनी पुन्हा मार्गी होणार आहे म्हणजेच सरळ दिशेने भ्रमण सुरु करणार आहे. या बदलानुसार कुंभ राशीत शश राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगामुळे तीन राशींच्या भाग्यात दिवाळीचा आनंद सुरु होणार आहे. या राशी कोणत्या पाहूया..
दिवाळीच्या आधीच लक्ष्मीचे पूजन करण्याची संधी मिळणार, कोणत्या आहेत या राशी?
कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)
शनीची मार्गी होण्याची क्रिया ही कुंभ राशीतच होणार असल्याने प्रथम भावी प्रभाव हा कुंभ राशीत पाहायला मिळणार आहे. कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज आहेत. त्यामुळे मार्गी होत असताना ते कुंभ राशीच्या मंडळींची प्रगती व विकास सुद्धा सरळ मार्गी करू शकतात. मुख्य म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात या कालावधीत वाढ होईल. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहू शकता. आर्थिक लाभासाठी तुमची बुद्धी, वाणी व तुमचे आई- वडील मदत करू शकतात. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी संधी मिळू शकते पण तुम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी.
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वृषभ राशीला सुद्धा शनी मार्गी झाल्याने लाभ होण्याची चिन्हे आहेत. शश राजयोग तुमच्या नशिबाला लागलेले टाळे उघडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे अडकून पडलेले पैसे लगेचच परत मिळतील. नव्या संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुम्हाला सोन्यातून फायदा होण्याची अधिक प्रबळ चिन्हे आहते. तुम्हाला विवाह व संतती योग आहे. तुमच्या वाटेत येणारे अडथळे दूर होऊ शकता. तुमच्या रूपात घराला व घरातील सर्व कुटुंबाला मोठा फायदा होऊ शकतो यामुळे तुम्हाला सुद्धा स्वतःचे कौतुक वाटू शकते. समाजातील मान- सन्मान वाढीस लागेल.
हे ही वाचा << १८ महिन्यांनी राहू- केतू गोचर, तुमच्या नशिबात काय लिहिलंय? मेष ते मीन, तुमच्या राशीला काय फायदा, पाहा
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
शनी मार्गी झाल्याने तयार होत असलेला शश राजयोग हा सिंह राशीच्या मंडळींसाठी अनुकूल असा कालावधी घेऊन येणार आहे. शनीच्या प्रभावाचे वैशिष्ट्य हेच की तुम्हाला शुभ- अशुभ कोणताही प्रभाव हा अत्यंत तीव्र स्वरूपात दिसून येतो. म्हणूनच तुम्हाला येत्या काळात होणार लाभ सुद्धा आजवर न अनुभवलेल्या स्वरूपात असणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्याला सुद्धा शनीची मदत होणार आहे. पती- पत्नीचे नाते दृढ होईल. आर्थिक फायद्यांसाठी तुमच्या जोडीदाराची साथ कारण ठरेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)