Shani Nakshatra Transit 2025: शनी महाराज पुन्हा एकदा कर्मांचे हिशेब घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. कर्मफळदाता शनी ग्रह १८ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या चौथ्या पदात प्रवेश करणार आहे. हा बदल साधासुधा नाही, तर जीवनात उलथापालथ करणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे साडेसाती झेलणाऱ्या पाच राशींना या गोचराचा जबरदस्त फटका बसणार आहे. करिअर, पैसा, नातीगोती व तब्येत यांवर याचे थेट परिणाम दिसतील, असा इशारा ज्योतिषतज्ज्ञ देत आहेत. काहींना अचानक खर्च, कर्ज, तणावाचा सामना करावा लागू शकतो, तर काहींची शनी महाराज आजारातून थोडीशी सुटका करू शकतात. कोणत्या राशींच्या लोकांच्या आयुष्यात शनीचा हा नक्षत्रबदल कहर निर्माण करणार? पुढील काही महिने तुमचे आयुष्य सुखद जाणार की त्यात संकटांचा महापूर येणार? याचा अंदाज तुम्हाला धक्का देईल… चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
मेषसह ५ राशींसाठी शनी ठरणार घातक?
मेष
मार्च २०२५ पासून मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू झाली आहे आणि हा पहिला टप्पा आहे. या काळात करिअरमध्ये अडथळे, नातेसंबंधात तणाव आणि अचानक वाढणारे खर्च या सर्व बाबी तुमची मनस्थिती डळमळीत करू शकतात. पैशांची आवक–जावक सांभाळा, नाही तर आर्थिक संकट गडद होईल.
सिंह
शनीच्या अवकृपेखाली सिंह राशी आहे. एक चूक झाली तरी मोठा फटका बसू शकतो. कुठलेही अनैतिक काम टाळा, नाही तर त्यामुळे तुम्ही संकटात सापडण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्याच्या बाबतीत थोडा दिलासा मिळू शकतो. पैशांची स्थिती सामान्य राहील.
धनू
शनीच्या नक्षत्रबदलाने धनू राशीच्या लोकांवर फारसा वाईट परिणाम होणार नाही; पण काम आणि आराम यात संतुलन साधणे गरजेचे आहे. ताणतणाव वाढू शकतो, संयम राखणे आवश्यक आहे; अन्यथा मानसिक थकवा जाणवेल.
कुंभ
साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात सध्या कुंभ राशी आहे. ही वेळ अतिशय निर्णायक आहे. आळस किंवा जबाबदारी टाळण्याची चूक महागात पडेल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कोणत्याही बाबतीत शिस्तीचे काटेकोर पालन करा. मेहनतीचे फळ शेवटी मिळेल; पण शॉर्ट कट घेतला, तर संकट ओढवेल.
मीन
साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून मीन राशीचे लोक जात आहेत आणि हा सर्वाधिक कष्टदायी कालावधी मानला जातो. अगदी छोटी चूकही मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. जबाबदाऱ्यांचा बोजा वाढेल, मानसिक दबाव जाणवेल. या काळात ध्यानधारणा व संयम हेच तुमचे संरक्षण कवच ठरेल.
एकूणच पाहता, शनीचा हा नक्षत्रबदल साडेसाती-अवकृपा भोगणाऱ्यांसाठी इशारा आहे. एक चुकीचं पाऊल आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकतं. सावध राहा, शिस्तीत राहा – नाही तर शनी महाराज दया दाखवणार नाहीत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)