Shani Planet Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. यानुसार त्यांचा प्रभाव सुद्धा कमी अधिक शक्तिशाली होत असतो. ग्रहांच्या स्थितीनुसार १२ राशींच्या गोचर कुंडलीत सुद्धा वेळोवेळी बदल पाहायला मिळतात. जसे की आपल्यालाही ठाऊक असेल कर्मदता व कलियुगातील दंडाधिकारी शनिदेव हे २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत स्थिर झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनीचा कुंभ राशीत उदय झाला आणि आता गुढीपाडव्याच्या चार दिवस आधीपासून शनिदेव हे अत्यंत शक्तिशाली रूपात पाहायला मिळणार आहेत. याचा प्रभाव काही राशींवर अत्यंत लाभदायक ठरू शकतो, शनीच्या ग्रहस्थितीनुसार कोणत्या राशीला सर्वाधिक फायदा होणार हे जाणून घेऊया…

मकर (Makar Zodiac)

शनीदेव मकर राशीच्या मंडळींना सोन्याच्या पाऊलाने शुभाशीर्वाद देऊ शकतात. आपल्याला आर्थिक बाबींमध्ये प्रचंड यश मिळवून देणारा हा येणारा काळ आहे. तसेच तुम्हाला मानसिक ताणतणावातून सुद्धा शनिदेव मुक्त करू शकतात. येत्या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी सुद्धा मिळू शकते. तुम्हाला अधिकाधिक लाभ हा गुंतवणुकीतून मिळू शकतो. ज्या मंडळींचे काम तेल, पेट्रोल, लोह व सोन्याशी निगडित आहे त्यांच्यावर शनीचा विशेष आशीर्वाद असू शकतो. नोकरदार मंडळींच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू शकते.

Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी

कुंभ (Kumbh Zodiac)

शनिदेव हे मुळातच कुंभ राशीत असल्याने २०२३ चे संपूर्ण वर्ष हे कुंभ राशीसाठी मोठ्या हालचाली घेऊन आले आहे. १८ मार्चला शनिदेव आपल्या राशीत शक्तिशाली स्थळी स्थिर होऊन शश महापुरुष राजयोग साकारणार आहे. येत्या काळात आपल्याला माता लक्ष्मी सह सरस्वतीचा सुद्धा आशीर्वाद लाभू शकतो. आपल्या वैवाहिक जीवनातील बाधा दूर होण्यासाठी हा शुभ काळ ठरू शकतो. जर आपण नव्या नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला लवकरच एका हवीहवीशी संधी लाभू शकते.

वृषभ (Taurus Zodiac)

शनि देव शक्तिशाली होताच वृषभ राशीच्या भाग्योदयाची चिन्हे आहेत. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत दोन राजयोग तयार करत आहे. येत्या काळात आपल्याला वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे. आपले आर्थिक स्रोत वाढतील तसेच समाजातील मान- सन्मान सुद्धा वाढीस लागेल/ तुम्हाला पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. येत्या काळात विमान प्रवासाची चिन्हे आपल्या कुंडलीत आहेत तुम्हाला सरकारी योजनांमुळे काही प्रमाणात धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< चैत्र नवरात्रीपासून लक्ष्मी ‘या’ राशींच्या नशिबाला देईल कलाटणी? पाच ग्रह एकत्र देऊ शकतात धनलाभासह श्रीमंती

तूळ (Tula Zodiac)

शनिदेवांनी आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग साकारलेला आहे. येत्या काळात आपल्याला आध्यात्मिक गोष्टींमधले रस वाढलेला जाणवू शकतो. आपले काम संशोधन संबंधीत असल्यास तुम्हाला इच्छापूर्तीचे योग आहेत. प्रेम संबंध सुधारु शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासही उत्तम काळ आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)