Saturn and Sun Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते. सध्या सूर्य मिथुन राशीत असून शनीदेव मीन राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, १७ सप्टेंबर रोजी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश झाला तर शनीदेव सध्या मीन राशीत विराजमान आहे, खरंतर सूर्य आणि शनी एकमेकांपासून सातव्या भावात विराजमान असून यामुळे समसप्तक योग निर्माण होईल.
ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीला पिता-पुत्र म्हटले जाते, परंतु या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुत्व असल्याने अनेकदा या दोन ग्रहांची युती १२ पैकी काही राशींसाठी हानिकारक ठरू शकते.
शनी-सूर्याची जोडी ‘या’ राशींसाठी घातक
मेष (Mesh Rashi)
मेष राशीसाठी हा काळ मानसिक तणावाने भरलेला राहू शकतो. कार्यस्थळी अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. विनाकारण पैसे खर्च केल्याने तुमचे बजेट नंतर बिघडू शकते. करिअरमध्ये यश मिळणार नाही. काही लोकांना दिशाभूल करणारी बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी या काळात अडचणी वाढू शकतात. या राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शरीरातील दुर्बलता जाणवेल. या काळात कुणालाही उधार देणे टाळा, पैसा अडकू शकतो. घरगुती वाद आणि क्रोधाचा उद्रेक तुमचे संबंध बिघडवू शकतो. एक मोठा फायदेशीर करार तुमच्या हातातून निसटू शकतो. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी वाईट काळ सुरू होऊ शकतो. या काळात तुमची कुणाकडूनही फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. या काळात मोठं आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. नोकरीशी संबंधित ऑफर जाऊ शकतात. आरोग्य खालावणे, कामाच्या ठिकाणी वादविवाद, घरातील सदस्यांशी मतभेद, अचानक खर्च आणि व्यापारात घट याचा अनुभव येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)