Shani Jupiter Transit In 2023: नववर्ष २०२३ मध्ये सर्वात महत्त्वाचे व मोठे ग्रह आपले स्थान सोडून राशी व नक्षत्र परिवर्तन करणार असल्याचे समजत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तब्बल ३० वर्षांनी शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ मध्ये येणार आहेत. तर याच काळात मकर राशीत मंगळग्रह सुद्धा प्रवेश घेणार आहे. येत्या काळात शनिसह गुरुची चाल सुद्धा बदलण्याची शक्यता आहे ज्याचा प्रभाव सर्वच १२ राशींवर दिसून येऊ शकतो. तब्बल १८ महिन्यांनंतर राहू व केतू सुद्धा आपला भ्रमण मार्ग बदलणार आहेत तर शनीच्या साडेसातीमधून काही राशींची सुटका होणार आहे. येत्या काळात नक्की कोणत्या वेळी आपल्या राशीच्या भाग्यात धनलाभाचे योग आहेत हे जाणून घेऊयात..
शनि- गुरु- राहू- केतू कधी करणार गोचर?
- २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात गुरु मेष राशीत प्रवेश घेणार आहे.
- वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १७ जानेवारीला शनि कुंभ राशी प्रवेश घेणार आहे.
- ऑक्टोबर महिन्यात राहू मीन राशीत गोचर करणार आहे तर केतू ३० ऑक्टोबर कन्या राशीत प्रवेश घेणार आहे.
गुरुग्रह कोणाला देऊ शकतात धनलाभ?
गुरु ग्रहाचे गोचर होताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मेष, तुळ, कर्क, कन्या व मीन राशीला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात मेष राशीला नव्या नोकरीची संधी लाभू शकते तर तूळ राशीच्या भाग्यात नवनवीन धनप्राप्तीचे मार्ग तयार होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आपल्याला नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. कर्क राशीला सुद्धा आपल्या नशिबाची साथ लाभू शकते. तुमच्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊन तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तर कन्या राशीला जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. मीन राशीच्या भाग्यात एप्रिलच्या मधल्या आठवड्यात प्रचंड धनलाभाचे योग आहेत.
शनिदेव बनवणार का तुमच्या राशीला श्रीमंत?
शनिदेवाच्या गोचरचा सर्वात मोठा फायदा हा कुंभ राशीत दिसून येऊ शकतो. यासह वृषभ, मिथुन, तूळ, धनु या राशींना सुद्धा श्रीमंत होण्याची संधी मिळू शकते. येत्या फेब्रुवारीत मिथुन राशीची शनीच्या साडेसातीतून मुक्ती होणार असल्याने त्यांना कामात प्रगती व त्याहीपेक्षा वेगवान धनप्राप्ती होऊ शकते. जानेवारीत तसेच कुंभ राशीत शनिदेवाचा प्रभाव सुरु होणार आहे पण साडेसातीतही शनिदेव आपल्या लाडक्या राशीला फार त्रास देण्याची शक्यता कमी आहे. तुम्हाला जुन्या आजारातून मुक्ती मिळू शकते. दुसरीकडे जानेवारी पासून ते मार्च पर्यंत धनु राशीची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी अत्यंत शुभ काळ ठरू शकतो.
हे ही वाचा<< १ जानेवारीपासून कर्क राशीत शनिदेव घडवणार सर्वात मोठे बदल? २०२३ मध्ये आर्थिक स्थिती, प्रेम, आरोग्य कसे असणार?
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)