Shani Transit Shatabhisha Nakshatra: ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार २०२३ वर्षात मार्च महिन्यात १५ तारखेला शनि पहिल्यांदा शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेणार आहे. तर १७ ऑक्टोबर पर्यंत शनिदेव याच शतभोशा नक्षत्रात स्थिर असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १७ ऑक्टोबला शनिदेव पुन्हा आपल्या मूळ धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश घेतील.

शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. राहू हा अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो तर शनिला न्यायदेवता व कर्मदाता म्हणून ओळखले जाते. या दोन्ही ग्रहांमध्ये फार मित्रत्व नसले तरी त्यांच्या युतीने काही राशींच्या गोचर कुंडलीत सकारात्मक फरक दिसून येऊ शकतो. तर काही राशींना येत्या काळात धन व तनाची काळजी सुद्धा घ्यावी लागू शकते. शनीच्या नक्षत्र बदलानुसार कोणत्या राशीला कसा फरक दिसून येणार हे आपण जाणून घेऊया.

Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब
Sagittarius April Horoscope
Sagittarius : धनु राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात घ्यावी विशेष काळजी; कशी असेल त्यांची आर्थिक स्थिती अन् लव्ह रिलेशन? जाणून घ्या

मेष (Aries Zodiac)

शनिदेव शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेताच मेष राशीसाठी फायद्याचा कालावधी सुरु होऊ शकतो. जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सुद्धा वृद्धीचे योग आहेत. तुम्हाला प्रलंबित काळापासून केवळ आळसामुळे अडकून पडलेली कामे पूर्ण होताना दिसतील आणि मुख्य म्हणजे यातूनच आपल्याला बक्कळ धनलाभ सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला सफेद रंग हा येत्या काळात अत्यंत शुभ ठरू शकतो. या रंगाचे प्रतीक असणारी मानसिक शांती सुद्धा आपल्याला अनुभवता येऊ शकते.

मिथुन (Gemini Zodiac)

शनिदेव मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी भ्रमण करणार आहेत. येत्या काळात आपल्याला परदेशवारीचे योग येऊ शकतात. तुम्हाला धार्मिक कामांमध्ये रुची वाढताना जाणवेल. १७ जानेवारीलाच आपल्या राशीची शनीच्या साडेसातीतून मुक्ती झाली आहे त्यामुळे येणारे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभाचा भांडार घेऊन येऊ शकते. समाजात तुमचा मान- सन्मान सुद्धा वाढीस लागू शकतो. तुम्हाला वाडवडिलांच्या संपत्तीच्या रूपात अचानक लाखो रुपयांचा लाभ होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशि (Aquarius Zodiac)

शनी २०२३ च्या सुरुवातीलाच ३० वर्षांनी पहिल्यांदा आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ मध्ये स्थिर झाले आहेत. येत्या काळात शनीचा नक्षत्र बदल जरी होणार असला तरी कुंभ राशीतील प्रभाव मात्र कायम असणार आहे. शतभिषा नक्षत्रात प्रवेश करताना शनीची स्थिती बदलल्याने येत्या काळात कुंभ राशीला वेग अनुभवता येऊ शकतो. आपल्याला नवनवीन संधी चालून येतील पण अत्यंत काळजीपूर्वक निवड व परिश्रम करा अन्यथा ताण वाढण्याची शक्यता अधिक आहे. आपल्याला आकस्मिक धनलाभाचे सुद्धा योग आहेत.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी होळीला जुळला शनीचा त्रिगही योग! ६ मार्चपासून ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभासह आनंदाची उधळण

शनीच्या नक्षत्र बदलानंतर ‘या’ राशींची काळजी वाढणार?

जेव्हा राहूच्या नक्षत्रात शनि प्रवेश करेल तेव्हा त्यांचा प्रभाव वृषभ, कर्क, तूळ व मकर राशीवर दिसून येणार आहे. या राशीच्या मंडळींना आपल्या धन व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्वचेसंबंधित विकारांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच सावध होऊन खबरदारी बाळगणे हिताचे ठरेल.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)