Saturn Retrograde July 2025: जुलै महिना ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण- कर्मफळ दाता शनी श्रावण सुरू होण्यापूर्वीच वक्री (उलटी चाल) होणार आहेत. मीन राशीतून शनी वक्री होताच काही राशींच्या लोकांना मोठे धक्के बसू शकतात; तर काहींना सावध राहण्याचा इशारा मिळतोय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वक्री अवस्थेतील शनी सर्वांत प्रभावी आणि बलशाली मानला जातो आणि व्यक्तीच्या नशिबावर त्याचा थेट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
‘या’ ३ राशींसाठी जुलै महिना ठरणार धोक्याचा!
वृषभ (Taurus)
शनी वक्री होताच वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक, शैक्षणिक व वैयक्तिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. खर्च अचानक वाढून काहींवर तर कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आरोग्यही चांगले राहणार नाही. आर्थिक बाबतीतही खिसा रिकामा होऊ शकतो. मालमत्ता किंवा शेअर बाजारात गुंतवणूक टाळा. कारण- नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमी जीवनातही वाद होऊ शकतात. सामाजिक जीवनातही तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते.
कर्क (Cancer)
हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी मानसिकदृष्ट्या थोडा खडतर ठरू शकतो. धर्मिक कार्यांत अडथळे, विरोधकांकडून त्रास, आर्थिक बिघाड व वादविवाद यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात पोटाचे विकार होऊ शकतात. बाहेरचे खाणे शक्यतो टाळा; अन्यथा रुग्णालयाची पायरी चढावी लागू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अतिशय खराब होऊ शकते. या काळात कोणत्याही अनावश्यक चर्चेत गुंतू नका. व्यवसायात नुकसान होऊ शकते. आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास हानी टळू शकते. प्रेमी आणि वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थितीदेखील उद्भवण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces)
शनी वक्री होणार असल्याने मीन राशीचे लोक सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. नातेसंबंधात दुरावा, जीवनसाथीसोबत वाद, मानसिक अशांतता व आरोग्याचा बिघाड यांची शक्यता आहे. त्याशिवाय कामात आळस येईल आणि प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. यावेळी तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. या काळात सामाजिक जीवनातही काही अडथळे येऊ शकतात. डोकेदुखी किंवा तणाव यासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)