Shanidev: ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला कर्माचा न्यायकर्ता आणि दाता मानले जाते. म्हणजे शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. १७ जानेवारी रोजी शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. डिसेंबर २०२३ पर्यंतचा काळ या राशींसाठी शुभ ठरणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

डिसेंबर २०२३ पर्यंत ‘या’ राशींवर राहील शनिदेवाची कृपा

मेष राशी

मेष राशीच्या लोकांवर डिसेंबर २०२३ पर्यंत शनीदेवाची विशेष कृपा राहील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. त्याचबरोबर तुम्हाला याकाळात कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव घेता येईल. यासोबतच तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता. तसचं शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या असलेल्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तसेच नोकरी करत असलेल्या लोकांसाठी या काळात पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी डिसेंबर २०२३ पर्यंतचा काळ अत्यंत शुभ असेल. कारण शनिदेवाची विशेष कृपा या राशीवर आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तसंच तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत चांगला वेळ देखील घालवाल. याकाळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. तुम्हाला या काळात भरपूर फायदा होईल. तसंच तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असू शकतो.

(हे ही वाचा: फाल्गुन महिना सुरू झाल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? माता लक्ष्मी वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी)

मिथुन राशी

मिथुन राशीवर शनिदेवाची विशेष कृपा आहे त्यामुळे डिसेंबर २०२३ पर्यंतचा काळ तुम्हाला धनवान बनवू शकतो. याकाळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. तसंच आरोग्याशी संबंधित समस्यापासूनही याकाळात तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमची प्रशंसा करतील. तसेच तुम्हाला या काळात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)