Shravan Purnima 2025: यंदा श्रावण पौर्णिमेला ग्रहांची खास स्थिती निर्माण झाली आहे. या दिवशी तीन ग्रह आपल्या स्वराशीत राहतील, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, गुरू आणि शनी आपल्या स्वराशीत राहतील. ज्यामुळे एक दुर्लभ योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होत आहे. ज्यामुळे त्याचे महत्व अधिक वाढले आहे.
श्रावण पौर्णिमा तीन राशींसाठी लाभदायी
वृषभ (Vrushabh Rashi)
श्रावण पौर्णिमा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.
सिंह (Singh Rashi)
श्रावण पौर्णिमा सिंह राशीच्या लोकांसाठीही खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही श्रावण पौर्णिमेचा काळ अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)