Vivah Muhurat In May 2025 : हिंदू धर्मात कोणतेही मंगल कार्य शुभ मुहूर्त पाहून केले जाते. खासकरून लग्न विवाहासारख्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये याचे महत्त्व अधिक आहे. विवाहाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाहद्वारे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात ज्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारतात. विवाहाला सामाजिक जीवनात व वैयक्तिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे परिवार निर्माण होणे, सामाजिक स्थिरता निर्माण होणे, मानसिक व शारीरिक गरज, प्रेम आणि संबंध दृढ होणे, सहकार्य मिळणे इत्यादी लाभ होतो. आपल्या शास्त्रामध्ये विवाहाला १६ संस्कारापैकी एक मानले जाते. आणि त्यासाठी मुहूर्त लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर तसेच त्या कार्यावर पडतो.

१३ एप्रिल २०२५ ला खरमास समाप्तीसह विवाहाचे शुभ मुहूर्त सुरू झाले आहे. अनेक कुटुंब परिवारात विवाह आणि मांगलिक कार्यांची जोरदार तयारी सुरू आहे. आता सर्वांची नजर मे महिन्यावर आहे कारण या महिन्यात विवाहासाठी अनेक शुभ मुहुर्त निर्माण होत आहे. जर तुम्ही सुद्धा मे महिन्यात लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्यात कोणत्या तारखा विवाहासाठी शुभ आहे, तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मे २०२५ मध्ये विवाहसाठी शुभ मुहूर्त

जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर लग्नाची प्लानिंग करत असाल तर मे महिन्यात काही खास शुभ तिथी आहेत, त्या खालीलप्रमाणे – १, ५, ६, ८, १०., १४, १५, १६, १७, १८, २२, २३, २४, २७, आणि २८ मे हे विवाहासाठी १५ शुभ मुहूर्त आहेत. यापैकी कोणत्याही शुभ तिथीवर तुम्ही तुमच्या सोयीनुसार लग्न करू शकता.

मे २०२५ महिन्यातील विवाह मुहूर्त

१ मे २०२५, गुरुवार
५ मे २०२५, सोमवार
६ मे २०२५, मंगळवार
८ मे २०२५, गुरुवार
१० मे २०२५, शनिवार
१४ मे २०२५, बुधवार
१५ मे २०२५, गुरुवार
१६ मे २०२५, शुक्रवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१७ मे २०२५, शनिवार
१८ मे २०२५, रविवार
२२ मे २०२५, गुरुवार
२३ मे २०२५, शुक्रवार
२४ मे २०२५, शनिवार
२७ मे २०२५, मंगळवार
२८ मे २०२५, बुधवार